चिखली येथे कोरोना नियमांच्या चाकोरीत बैलपोळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:00:42+5:30

दरवर्षी नक्षीकाम केलेली झूल, बैलांच्या शिंगाना बेगड तसेच चांगले सजवून गावातून दरवर्षी मिरवणूक काढून गावातील हनुमान मंदिरासमोर लांब तोरण बांधले जाते. या तोरणाखाली गावातील सर्व बैलजोड्या एकत्र उभ्या केल्या जातात. मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी मंदिरासमोर एकेक बैलजोडी उभी करुन पूजन केले . गावकऱ्यांमध्ये बैल पोळ्याचा उत्साह असला तरी प्रशासनाच्या निर्देशामुळे गावकऱ्यांनी बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय केला.

In Chikhali, in the circle of Corona rules, bullfighting in excitement | चिखली येथे कोरोना नियमांच्या चाकोरीत बैलपोळा उत्साहात

चिखली येथे कोरोना नियमांच्या चाकोरीत बैलपोळा उत्साहात

Next
ठळक मुद्देमिरवणुका केल्या रद्द : सण सर्जा राजाचा, परंपरा झाली खंडीत, प्रशासनाच्या निर्देशाचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दरवर्षी आपल्या लाडक्या सर्जा-राजाचा बैलपोळा सण उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे . मात्र यंदा शेतकऱ्यांचा आवडता बैल पोळा सणासाठी प्रशासनाने निर्देश दिल्याने भंडारा तालुक्यातील चिखली येथे गावकऱ्यांनी शासकीय नियमांच्या पालनात साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा केला. यावर्षी प्रथमच बैलांच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या. श्रावणातील अमावसेला साजरा होणारा बैलपोळा सणावर यावर्षी कोरोनाचे सावट ग्रामीण भागातही दिसून आले.
भंडारा तालुक्यातील चिखली हे शेतीत नवनवीन प्रयोग करणारे एक छोटेसे खेडेगाव. मात्र शेतकरी नवनवीन उपक्रम राबवत असल्याने मुख्य व्यवसाय शेती असणाऱ्या या गावात आजही गावात ५० बैलजोड्या आहेत.
दरवर्षी नक्षीकाम केलेली झूल, बैलांच्या शिंगाना बेगड तसेच चांगले सजवून गावातून दरवर्षी मिरवणूक काढून गावातील हनुमान मंदिरासमोर लांब तोरण बांधले जाते. या तोरणाखाली गावातील सर्व बैलजोड्या एकत्र उभ्या केल्या जातात. मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी मंदिरासमोर एकेक बैलजोडी उभी करुन पूजन केले . गावकऱ्यांमध्ये बैल पोळ्याचा उत्साह असला तरी प्रशासनाच्या निर्देशामुळे गावकऱ्यांनी बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय केला.
याबाबत बोलताना चिखली येथील शेतकरी तंमुस अध्यक्ष विष्णु हटवार, तानाजी गायधने, शाम आकरे यांनी सांगितले की, वर्षातून एकदा येणारा बैलपोळा सण यावर्षी प्रथमच मिरवणुका व गावकरी एकत्र न येता साजरा झाल्याने अनेक वर्षांची परंपरा प्रथमच खंडित झाल्याचे सांगितले. आजही गावात ५० बैलजोड्या आहेत.
यांत्रिकीकरणाचा वापर वाढत चालल्याने आणि शेतकऱ्यांनी बैलजोड्या कमी केल्याचे चित्र अनेक गावात दिसत असले तरी चिखलीमध्ये आजही अनेक शेतकऱ्यांच्या दारात आपली बैल जोडी उभी आहे. दारात अडीअडचणीच्या वेळी बैल नेहमी बळीराजाच्या मदतीला धावून येत असल्याचेही येथील वयोवृद्ध शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले . बैलपोळा सण फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालनासाठी गावातील रामदास मेहर, सुरेश मेहर, सुखदेव मेहर, सुखदेव वाघमारे, पंचकमेटी अध्यक्ष अशोक गायधने, तानाजी गाधने, रेवानंद गायधने, होमदास हटवार, पोलीस पाटील गोवर्धन मेहर व अन्य गावकऱ्यांनी सहकार्य केले.

बैलपोळा सणाला गावातील सर्व बैलजोड्या एकाच तोरणाखाली आणून गावातील हनुमान मंदिरासमोर पूजन करण्याच्या परंपरेला यंदा प्रथमच खंड पडला. यावर्षी गावातून बैलांच्या मिरवणूकाही निघाल्या नाहीत. मुलांचा तान्हा पोळाही भरणार नसल्याचे दु:ख वाटत आहे.
-तानाजी गायधने,
शेतकरी चिखली

Web Title: In Chikhali, in the circle of Corona rules, bullfighting in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.