मुलाचा रुग्णालयात मृत्यू, पण कशाने? मृतदेहासह ग्रामस्थ जिल्हा कचेरीत

By युवराज गोमास | Published: February 8, 2024 05:19 PM2024-02-08T17:19:55+5:302024-02-08T17:20:34+5:30

ढिवरवाडातील आठ वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण , जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने शवविच्छेदन.

Child died in hospital in bhandara all villagers with dead body in district police station | मुलाचा रुग्णालयात मृत्यू, पण कशाने? मृतदेहासह ग्रामस्थ जिल्हा कचेरीत

मुलाचा रुग्णालयात मृत्यू, पण कशाने? मृतदेहासह ग्रामस्थ जिल्हा कचेरीत

युवराज गोमासे, भंडारा : मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत (वर्ग २ री) शिकणारा एकुलता आठ वर्षीय विद्यार्थी निहाल रवींद्र मेश्राम यास लघवीच्या जागेवरील शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथील लता मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्याचा अचानक मृत्यू झाला. गुरूवारला पहाटेच्या सुमारास मृतदेह गावात येताच मृत्यू नेमका कशामुळे ? यासंबंधी संदेहाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरणी ग्रामस्थांनी सकाळी १०:३० वाजताचे वाजताचे सुमारास प्रेतासह जिल्हाधिकारीवर धडक दिली. न्यायायी मागणी करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी योेगेश कुंभेजकर यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून प्रेत शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविले.

मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा येथील निहाल रवींद्र मेश्राम (८) या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलाला लघवीच्या जागेवरील शत्रक्रियेसाठी साेमवार ५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होेते. रूग्णालयात बुधवारला रात्री ८ वाजताचे दरम्यान त्याचा मृत्यू झाला. येथील डॉक्टरांनी मृत्यूचे कोणतेही कारण न सांगता व प्रेताचे शवविच्छेदन न करता मृतदेह पालकांच्या स्वाधीन केले. मुलाच्या मृृत्यूमुळे शोकाकूल वातावरणात असलेल्या पालकांनी गुरूवारला पहाटे ३ वाजता मृतदेह गावात आणले. मृतदेह गावात पोहचताच संपूर्ण गावा हळहळत होता. परंतु, मृत्यू नेमका कशामुळे ? यासंबंधी संदेहाचे वातावरण निर्माण झाले. मुलाची शत्रक्रिया लघवीच्या जागेवरील मृत्र बाहेर पडण्याच्या बाजुला असलेल्या छिद्रासंबंधीची होती. त्यामुळे मृत्यूसंबंधी अधिक संशय निर्माण झाल्याने संतत्प ग्रामस्थांनी मृत्यूचे कारण काय, हे जाणून घेण्यासाठी व गरीब पालकांना न्याय मिळण्यासाठी चारचाकी वाहनात प्रेत ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तब्बल दोन तास मृतदेह जिल्हाधिकाऱी कार्यालय परिसरात होते. ग्रामस्थांचा आक्रोश वाढीस लागताच तातडीने पोलिस बंदोबस्त लावला गेला. जिल्हाधिकारी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला :

न्यायासाठी ढिवरवाडा ग्रामस्थ जिल्हाधिकारी परिसरात तब्बल दोन तास प्रेतासह तळ ठोकून होते. जिल्हाधिकाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविले. जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. अखेर सर्वांच्या सहमतीने प्रेत जिल्हा सामान्य रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले अन् तणाव निवळला. शिष्टमंडळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी, जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, एकनाथ फेडर ढिवरवाडाचे माजी सरपंच धामदेव वनवे व अन्य नागरिकांचा समावेश होता.

संपूर्ण तपासणीनंतरच मुलांना शस्त्रक्रियेसाठी नेले जाते. परंतु, शत्रक्रियेदरम्यान डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला असावा. शिवाय शवविच्छेदन न करता डॉक्टरांनी अज्ञानी पालकांच्या स्वाधीन मृतदेह केला, ही बाब संदेहास्पद आहे. मुलास राजीव गांधी अपघात विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. तर डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे. - किरण अतकरी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट.

लघवीच्या जागेवरील शत्रक्रियेसाठी त्याला नेण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. दोषी डाॅक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला जावा. मुलाच्या पालकांस न्याय मिळावा, शासकीय योजनेचा लाभ दिला जावा, ही अपेक्षा आहे.- धामदेव वनवे, माजी सरपंच, ढिवरवाडा.

मुलाची शस्त्रक्रिया ही नाॅर्मल स्वरूपाची होती. यात कधीही मृत्यू होत नाही. परंतु, तरिही मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ही बाब संदेहास्पद आहे. न्यायासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. मुलाची सदोष हत्या झाल्याचा संदेह आहे. न्याय मिळाला पाहिजे.- नरेश ईश्वरकर, एकनाथ फेंडर, जिल्हा परिषद सदस्य.

Web Title: Child died in hospital in bhandara all villagers with dead body in district police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.