मुलाने केली जन्मदात्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2016 12:22 AM2016-03-28T00:22:34+5:302016-03-28T00:22:34+5:30

दररोजच्या भांडणाला कंटाळून मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यावर काठीने हल्ला केला.

The child has murdered the biographer | मुलाने केली जन्मदात्याची हत्या

मुलाने केली जन्मदात्याची हत्या

Next

गावात भीतीचे वातावरण : दावेझरी येथील घटना
चुल्हाड (सिहोरा)/तुमसर : दररोजच्या भांडणाला कंटाळून मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यावर काठीने हल्ला केला. यात पित्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दावेझरी येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. साहेबराव भगत (५७) असे मृत पित्याचे नाव आहे.
दीड हजार लोकवस्ती व जंगल व्याप्त भागात असलेल्या दावेझरी गावात धुळवळीच्या पाडल्यानंतर थरार घडल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.
या गावात वास्तव्य करणारे साहेबराव भगत आणि शैलेष भगत या दोघां बापलेकाचे नेहमी या ना त्या कारणावरुन भांडण होत होते. पित्याच्या रोजच्या भांडणाने शैलेश वैतागला होता. दिवस-रात्र पिण्याचे भांडण शैलेश च्या नाकी नऊ आले होते. घटनेच्या दिवशी बाप लेकाच जोरदार भांडण झाले. रोजचे भांडण असल्याने कुणी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. या भांडणाने शैलेश आईला घेवून एकाच घरात वास्तव्य करीत असे.
याच घरात साहेबराव यांचेही वास्तव होते. एकाच घरात सर्वांचे वास्तव्य असले तरी पिता मात्र स्वतंत्र स्वयंपाक करीत होता. यामुळे साहेबरावला दारुचे व्यसन जळले होते. व्यसनाधीन झालेल्या साहेबराव रोज मुलासोबत भांडण करायचा. घटनेच्या दिवशी बाप-लेक असलेल्या साहेबराव व शैलेशचे घरगुती कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात शैलेशने साहेबरावच्या डोक्यावर काठीने एका पेक्षा अनेक वार केली.
यात पिता साहेबराव भगत यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलीस पाटील प्रदीप गायकवाड यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी शैलेश भगत (२३) यांचे विरोधात भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नागेश झायले करीत आहे. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)

Web Title: The child has murdered the biographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.