पालिकेने स्वच्छतेकडे पाठ फिरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 09:50 PM2018-11-27T21:50:00+5:302018-11-27T21:50:16+5:30

नगर पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीमेवर लक्ष केंद्रीत केले होते. नगरात प्रशासनाने दबदबा निर्माण केलेला होता. त्यामुळे नागरिकांना स्वच्छतेची सवय झालेली होती. मुख्याधिकारी बदलले आणि स्वच्छता मोहीम थांबली असे चित्र नगरात दिसत आहे. पालिकेने स्वच्छतेकडे पाठ फिरवली असल्याने गटार (नाली) घाण साचल्याने बुजलेली आहेत.

The child has turned away from cleanliness | पालिकेने स्वच्छतेकडे पाठ फिरवली

पालिकेने स्वच्छतेकडे पाठ फिरवली

googlenewsNext
ठळक मुद्देपवनीतील प्रकार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : नगर पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीमेवर लक्ष केंद्रीत केले होते. नगरात प्रशासनाने दबदबा निर्माण केलेला होता. त्यामुळे नागरिकांना स्वच्छतेची सवय झालेली होती. मुख्याधिकारी बदलले आणि स्वच्छता मोहीम थांबली असे चित्र नगरात दिसत आहे. पालिकेने स्वच्छतेकडे पाठ फिरवली असल्याने गटार (नाली) घाण साचल्याने बुजलेली आहेत.
स्वच्छता ही सेवा मोहिम सुरू असेपर्यंत पालिका प्रशासनाने शिक्षक, शिक्षकेतर व पालिकेच्या अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन नगरात स्वच्छता करुन घेतली. मोहिम थांबली, ज्यांनी स्वच्छता डोक्यावर घेतली होती अशा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. पालिकेचा जनमानसात दबदबा कमी झाला त्याचा विपरीत परिणाम स्वच्छतेवर झाला. नगरात स्वच्छता होती तेव्हा पर्यंत रोगराई चे प्रमाण कमी होवून रुग्णालय ओस पडले होते. आता चित्र उलट झाले आहे. नाल्यांचा उपसा थांबला, गटार- नाल्यांत घाण- पाणी साचले, नगरात डासांचे प्रमाण वाढले व त्याच बरोबर रोगराई वाढली. रुग्णालयात गर्दी वाढली.
स्वच्छतेचा आरोग्याशी संबंध असल्याने पालिका प्रशासनाने गटार- नाली उपसा नियमित ठेवून नगरात स्वच्छता ठेवावी अशी अपेक्षा नगरवासीयांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The child has turned away from cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.