गौतम वॉर्डातील बालोद्यान फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 09:54 PM2019-01-04T21:54:10+5:302019-01-04T21:54:36+5:30

नगर परिषद द्वारा निर्मित गौतम वाडार्तील बालोद्यान एक दशकानंतर फुललेले दिसत असल्याने परिसरातील नागरिकांना व बालकांना बालोद्यान लोकार्पणाची ओढ लागलेली आहे.

Children's Garden in Gautam Ward | गौतम वॉर्डातील बालोद्यान फुलले

गौतम वॉर्डातील बालोद्यान फुलले

googlenewsNext
ठळक मुद्देआज उद्घाटन : नागरिकांना मिळणार हक्काचे विरंगुळा केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : नगर परिषद द्वारा निर्मित गौतम वाडार्तील बालोद्यान एक दशकानंतर फुललेले दिसत असल्याने परिसरातील नागरिकांना व बालकांना बालोद्यान लोकार्पणाची ओढ लागलेली आहे.
बालोद्यानाचे कायापालट करण्यासाठी नगर परिषद अध्यक्षा पुनम काटेखाये व सहकारी पदाधिकारी यांनी प्राधान्यक्रमाने आर्थिक तरतुद करुन दुर्लक्षित बालोद्यानाला नवसंजीवनी दिलेली आहे.
गावातून उमरेड - पवनी - कर्हांडला अभयारण्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर असलेल्या बालोद्यानाकडे पर्यटकाचे लक्ष वेधले जाणार आहे. त्यामुळे पवनीच्या पर्यटनात भर पडली आहे.
याबाबत ‘लोकमत’ने यापूर्वी अनेकदा बालोद्यानाचे दुरावस्थेकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर बालोद्यानाचे भाग्य उजाडले व नव्या रुपात ते बालकांसाठी खुले केले जाईल.
शनिवारला ५ रोजी बालोद्यानाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे अशी माहिती नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी आमच्या प्रतिनिधीसह बोलताना दिली. बालोद्यानच्या निर्मितीमुळे नागरिकांना फिरण्याची सोय झाली आहे.

Web Title: Children's Garden in Gautam Ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.