लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडी दुप्पट वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:40 AM2021-08-21T04:40:03+5:302021-08-21T04:40:03+5:30
भंडारा : गत काही दिवसांपासून वातावरण बदलाने आजार बळावले आहेत. याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. अनेक ...
भंडारा : गत काही दिवसांपासून वातावरण बदलाने आजार बळावले आहेत. याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. अनेक बालकांमध्ये सर्दी, ताप, चिडचिडेपणासारखे आजार वाढले आहेत. त्यामुळे पालकांची चिंता आणखीनच वाढली आहे. सर्दी, ताप ही कोरोनाची लक्षणे असल्याने पालकांना भीती सतावत आहे. अनेक पालक मुलांना खाजगी रुग्णालयांत तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरुग्ण विभागात दाखल करीत आहेत. भंडारा शहरासह ग्रामीण भागातही अनेक रुग्णालये हाउसफुल्ल झाली असल्याचे चित्र बालरुग्णांच्या गर्दीवरून दिसून येत आहे.
बॉक्स
५० टक्के मुलांची कोरोना चाचणी
खाजगी रुग्णालयांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरुग्ण विभागात ताप, सर्दी असलेला बालकांची आधी कोरोना चाचणी करण्यात येते. लहान बालकांना बोलता येत नसल्याने आधी कोरोना चाचणीवर भर दिला जात आहे. हे चाचणीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून येत आहे. त्यामुळे दवाखान्याचा खर्च वाढला आहे.
ही घ्या काळजी....
१) पालकांनी शक्यतो मुलांना बाहेरील पाणीपुरी तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ खायला देऊ नयेत.
२) पावसाळ्याच्या दिवसांत शक्यतो पाणी उकळून निर्जंतुकीकरण करूनच प्यावे.
३) घराबाहेर पडताना मास्क लावणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाताना शक्यतो मुलांना घेऊन जाणे टाळावे.
बॉक्स..
डेंग्यू, मलेरियाची चाचणी....
जिल्ह्यात डेंग्यूचा रुग्ण दगावल्याने अनेकांना धास्ती बसली आहे. पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे डेंग्यू तसेच मलेरियाचे रुग्णही सापडत आहेत. अशा वेळी रुग्णांनी तत्काळ दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेण्याची गरज आहे. मात्र असे असूनही ग्रामीण भागात आरोग्य विभाग नागरिकांत जनजागृती करताना दिसत नाही.
कोट
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे बालरुग्णांची संख्या वाढली आहे. अनेकांना सर्दी, ताप दिसून येत आहे. यासाठी पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी.
बालरोगतज्ज्ञ, भंडारा
कोट
सध्या तापीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. वातावरण बदलाचा हा परिणाम आहे. मात्र अशावेळी पालकांनी बालकांसाठी तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेण्याची गरज आहे. घरच्या घरी कोणीही औषधोपचार करू नये.
बालरोगतज्ज्ञ, भंडारा