वङिलांच्या न्यायासाठी मुलांची सुरू आहे धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:34 AM2018-08-19T00:34:37+5:302018-08-19T00:37:10+5:30
शेतजमिनीच्या भांडणाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वृद्ध पित्याला कुटुंबातीलच व्यक्तीने मारले. मारहाणीची कैफियत पित्याने पोलीस ठाण्यात केली. पण पोलिसांनी वृद्ध पित्याला हाकलून लावले. मारहाणीविषयी तक्रार नोंदवून चौकशी करावी, या न्यायासाठी वृद्ध पित्याच्या मुलीनी पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडे धाव घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : शेतजमिनीच्या भांडणाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वृद्ध पित्याला कुटुंबातीलच व्यक्तीने मारले. मारहाणीची कैफियत पित्याने पोलीस ठाण्यात केली. पण पोलिसांनी वृद्ध पित्याला हाकलून लावले. मारहाणीविषयी तक्रार नोंदवून चौकशी करावी, या न्यायासाठी वृद्ध पित्याच्या मुलीनी पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडे धाव घेतली. सहनशिलतेचा अंत बघणारी घटना निलज बुज. येथे घडली. यासंबंधी शनिवारला विश्रामगृह मोहाडी येथे धनराज माटे, मुलगा संदीप व मुलगी संध्या यांनी पत्रपरिषद घेतली.
सामान्य जनतेला पोलीस शत्रू का वाटतात त्याचा पुरावा म्हणजे निलज येथे घडलेली घटना. जमिनीच्या वादातून मनराज माटे, अनिल माटे, लक्ष्मीबाई माटे यांनी धनराज माटे यांना लोखंडी खिळे असलेल्या काठीने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर याच शेतावरील जमिनीत गाडून टाकेन अशी धमकी धनराज माटे यांना देण्यात आली. फिर्यादी धनराज माटे पोलीस ठाणे करडी येथे गेले. तेथील पोलिसांनी साध्या कागदावर तक्रार लिहण्याची नाटक केली. तोंडी तक्रार लिहून झाल्यावर गुन्हा नोंदची प्रत मागण्यात आली. तथापि तक्रारीची प्रत फिर्यादी धनराज माटे यांना देण्यात आली नाही. खिळ्याच्या पाटीने मारहाण झाल्याने धनराज रक्तबंबाळ झाले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा फिर्यादी ठाण्यात गेले. तक्रार केल्याची प्रत मागितली. पण पोलिसांनी फिर्यादीला उलटच सुनावले. शेतीचा नेहमीचा वाद आहे. जागेसाठी कशाला भांडता. शेतजमीन देवून द्या असे धनराजला बाळकडू देण्यात आले. तुमचा जीव गेला तरी चालेल तक्रार घेतली जाणार नाही असा दमही करडी पोलिसांनी दिला. २ आॅगस्ट रोजीच्या घटनेसंबंधी फिर्यादीच्या मुलीने करडी पोलीस स्टेशन गाठले. परंतु पोलीस खात्यात मनराज माटे यांनी नोकरी केली. त्यांनी आपल्या ओळखीचा लाभ घेत फिर्याद नोंद करू दिली नाही असे जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दोन आठवड्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र न्याय मिळाला नाही.