चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारली मातीपासून गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:34+5:302021-09-18T04:38:34+5:30
विरली (बु.) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरवात केली होती. पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी ...
विरली (बु.) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरवात केली होती. पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी, हा हेतुूत्यामागे होता. विद्यार्थ्यांनी शाळेत शिकले खरे मात्र, त्याचे प्रात्यक्षीक वास्तविक जीवनात उतरवित विद्यार्थ्यांनी गट तयार करुन मातीपासून गणेशमूर्ती साकारुन तिची प्रतिष्ठापणा केली.
लाखांदूर तालुक्यातील विरली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता ७ वीच्या जयंत कोरे या विद्यार्थ्याने मातीपासून मूर्ती तयार केली. तिला रंगरंगोटी करुन शाळेतील शिक्षकांना दाखविली. शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत अन्य वर्गांतील विद्यार्थ्यांना सबंधित मातीची मूर्ती दाखवित इतरांना देखील प्रोत्साहित केले. त्यानुसार इयत्ता ६ वी मधील संचिता पवनकर, राणी येटरे, सम्यक नंदागवळी, प्रियंका हुमणे व सोनल बन्सोड या विद्यार्थ्यांनी गट तयार करुन मातीपासून गणेशमूर्ती तयार केली.
या गणेशमूर्तीची गावातील वरीष्ठांच्या मार्गदर्शनात गत गणेश चतुर्थीच्या दिवशी विधीवत प्रतिष्ठापणा करुन करुन नियमीत आरती देखील करीत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे गावांतील मोठ्या गणपती मंडळांकडून समाजप्रबोधनासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे पाहून हे चिमुकले आपल्या सवंगड्यांसोबत कविता वाचन, कथा सांगणे, अंताक्षरी, इंग्रजी शब्दांचे अर्थासह पाठांतरण यांसारखे अनन्यसाधारण शैक्षणीक जीवनात उपयुक्त असे उपक्रम राबवित आहेत.