चिंचोली गावाची स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:31 AM2021-03-15T04:31:21+5:302021-03-15T04:31:21+5:30

लाखांदूर : स्वच्छ व सुंदर गाव निर्मितीसाठी शासनाने विविध समाजोपयोगी अभियान राबविले आहेत.मात्र लोकसहभागाविना अनेक अभियान ग्रामपातळीवर अयशस्वी ठरल्याचे ...

Chincholi village's journey from cleanliness to prosperity | चिंचोली गावाची स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल

चिंचोली गावाची स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल

Next

लाखांदूर : स्वच्छ व सुंदर गाव निर्मितीसाठी शासनाने विविध समाजोपयोगी अभियान राबविले आहेत.मात्र लोकसहभागाविना अनेक अभियान ग्रामपातळीवर अयशस्वी ठरल्याचे बोलल्या जात आहे. या गैरप्रकारांना मुठमाती देत ग्रामस्वच्छता मोहिमेत गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिल्याने तालुक्यातील चिंचोली गावाने स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल चालविली आहे. सदर स्वच्छता मोहीम १४ मार्च रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील चिंचोली येथे येथील ग्रा.पं.सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारात लोकसहभागातून राबविण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य विषयक उपाययोजना म्हणून शासन स्तरावरुन ग्रामीण भागात विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र स्थानिक पदाधिकारी व नागरिकांच्या दुर्लक्षाने सदर समाजोपयोगी उपक्रम अयशस्वी ठरल्याचे बोलल्या जात आहे. सदर उदासीन मानसिकतेचा निषेध करीत चिंचोली ग्रा.पं.सरपंच प्रमोद प्रधान व अन्य ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात व पुढाकारात चिंचोली गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीम येथील गावकऱ्यांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून राबविण्यात येऊन या मोहिमेंतर्गत चिंचोली बसस्थानक ते चिंचोली गावापर्यंतचा मार्ग दुतर्फा स्वच्छ करण्यात आला.

सरपंच प्रमोद प्रधान यांच्या नेतृत्वात व पुढाकारात राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत येथील ग्रा.पं.चे माजी उपसरपंच हिरालाल रहिले, उपसरपंच प्रशांत मेश्राम, सदस्य ओमप्रकाश सोनटक्के, सोनाली निमजे, अंकोश प्रत्येके, अनुसया सतिमेश्राम, आशा नैताम, मीनल रामटेके, सुंदरा उईके, रायल फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष देवा बोकडे आणि सर्व सदस्य, आशा वर्कर शुधकला मेश्राम, तंटामुक्त अध्यक्ष, संतोष रहेले, पोलीस पाटील मोहन निमजे,मोरेश्वर निमजे, माजी सरपंच मोहनलाल सोंकुसरे, गोविंद मेश्राम, प्रदीप रहेले, संतोष तुमने, तथागत मेश्राम, राहुल घाटे ,विठ्ठल तुमने,ओमप्रकाश खरकाटे,नरेश सतिमेश्राम, विनोद ठाकरे, रामलाल दिघोरे, परिचर रवी रंगारी, किशोर मेश्राम, राजू सोनटक्के यासह शेकडो महिला पुरुष गावकरी सहभागी झाले होते.

दरम्यान तालुक्यातील चिंचोली ग्रा.पं.अंतर्गत स्वयंस्फूर्तीने लोकसहभागातून राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.

Web Title: Chincholi village's journey from cleanliness to prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.