कन्हाळगावात चितळाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 10:33 PM2018-08-05T22:33:16+5:302018-08-05T22:34:14+5:30
पवनी वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगल असलेल्या कन्हाळगाव वनक्षेत्राचे कक्ष क्र. ३२० मध्ये चितळाची शिकार करण्यात आल्याची बाब उघडकिला आली आहे. विशेष म्हणजे नागभीड वनपरिक्षेत्रातील ब्राम्हणी गावात या चितळाचे मांस शिजविण्यात आल्यानंतर चितळाची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीला आले. शिकार प्रकरणात कन्हाळगाव येथील आठ जणांना साहित्यासह अटक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पवनी वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगल असलेल्या कन्हाळगाव वनक्षेत्राचे कक्ष क्र. ३२० मध्ये चितळाची शिकार करण्यात आल्याची बाब उघडकिला आली आहे. विशेष म्हणजे नागभीड वनपरिक्षेत्रातील ब्राम्हणी गावात या चितळाचे मांस शिजविण्यात आल्यानंतर चितळाची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीला आले. शिकार प्रकरणात कन्हाळगाव येथील आठ जणांना साहित्यासह अटक करण्यात आली आहे.
नागभिड वनपरिक्षेत्रात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पवनी वनपरिक्षेत्रातील कन्हाळगाव येथे वनव्याप्त परिसरात शोध मोहिम राबविण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा आरोपींना अटक करुन नागभीड वनपरिक्षेत्राचे स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणात धनराज बकाराम गायकवाड, दत्तू दयाराम नागपूरकर, चंद्रहास नानाजी दिघोरे, नंदलाल दिघोरे, दिगांबर नागपूरे, गोपाल शिकरकर, रवि चाचरकर, रमेश डाहारे, सर्व रा. कन्हाळगाव यांना अटक करुन नागभिड वनक्षेत्रअधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
कन्हाळगाव वनपरिक्षेत्र कक्ष क्र. ३२० मध्ये सर्व आरोपी रात्री १.३० वाजताचे सुमारास शिकारीसाठी गेले. त्यावेळी त्यांनी बंदूकीच्या सहाय्याने चितळाची शिकार केली. यानंतर बेलाचे झाड तोडले व त्याचा लाकूड स्वयंपाक करण्यासाठी वापरला. बाम्हणी येथे साहित्य घेवून गेले. बाम्हणी येथे एकाने दारू पिण्यासाठी १०० रूपयांची मागणी केली. यावरून वाद होवून सदर चितळाच्या शिकारीचे प्रकरण वनविभागापर्यंत पोहचले.
नागभिड वनपरिक्षेत्रातील अधिकारी यांनी तातडीने दखल घेवून तिघांना अटक केली. अटक झालेल्या इसमात ब्राम्हणी येथील संजय नन्नावरे व अभिमन वाकडे तर कन्हाळगाव येथील धनराज गायकवाड यांचा समावेश होता. अधिक तपास केल्यानंतर कन्हाळगाव येथील गायकवाड यांचे सोबतीला अन्य सात जण असल्याचे निष्पन्न झाले. त्यानाही अटक करण्यात आली. शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पवनीचे वनपरिक्षेत्राधिकारी डी. एन. बारई, नवकिशोर रेड्डी, कर्मचारी शिवणकर, नागपूरे, कांबळे, करपते, माहुरे, मरवाडे यांनी सहकार्य केले.