तार कुंपणात वीजप्रवाह सोडून चितळाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:40+5:302021-05-06T04:37:40+5:30
सोमा श्रावण नेवारे व महेंद्र सोमा नेवारे रा. फुटाळा अशी आरोपींची नावे आहेत. जंगलाला लागून असलेल्या गावातील काही लोक ...
सोमा श्रावण नेवारे व महेंद्र सोमा नेवारे रा. फुटाळा अशी आरोपींची नावे आहेत. जंगलाला लागून असलेल्या गावातील काही लोक हरीण, सांबर, रानगवे, रानडुक्कर यासारख्या वन्य प्राण्यांची शिकार करातात अशी माहिती आहे. शिकारीसाठी ते वेगवेगळी पद्धत वापरतात. जांब कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या हिवरा उपवन क्षेत्रातील बिट क्रमांक २ मधील फुटाळा येथे चितळाची शिकार झाल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्राधिकारी के. जी. राठोड यांना मिळाली. त्यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. श्रावण व महेंद्र यांनी शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडून शिकार केल्याचे पुढे आले. त्यावरून या दोघांना अटक केली. पुढील तपास उपवनसंवरक्षक एस. बी. भलावी व सहाय्यक वनसंरक्षक एस. एन. शेंडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी केशव राठोड, क्षेत्रीय सहाय्यक एम. ए. खान, वनपाल इंद्रिस शेख, वनरक्षक बी. जी. लोडे, आर. डी. पांढरे यांनी करीत आहेत. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ९, ५२ अंतर्गत अटक करून न्यायालयासमोर हजर केले.