लाखांदूर जंगलात चितळाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 10:17 PM2018-01-08T22:17:40+5:302018-01-08T22:17:53+5:30

जंगलात जाळे लावून चितळाची शिकार करणाऱ्या आरोपींवर पाळत ठेऊन लाखांदूर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सहा आरोपींना अटक केली.

Chitala hunting in Lakhandur forest | लाखांदूर जंगलात चितळाची शिकार

लाखांदूर जंगलात चितळाची शिकार

googlenewsNext
ठळक मुद्देसहा आरोपींना अटक : शिकाऱ्यांकडून शस्त्र, साहित्य जप्त

आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : जंगलात जाळे लावून चितळाची शिकार करणाऱ्या आरोपींवर पाळत ठेऊन लाखांदूर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सहा आरोपींना अटक केली. ही कारवाई सोमवारच्या पहाटे अंतरगाव जंगलात करण्यात आली.
गोविंदा मोहनकार (६७), विलास वाघधरे (२५), मन्साराम वाघधरे (३५), दुर्योधन वाघधरे (५०), सोमेश्वर खरोले (२५) सर्व रा.चिंचोली, संजय मडावी (३६) रा.अंतरंगाव अशी आरोपींची नावे आहेत. लाखांदूर या जंगलव्याप्त तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याची गोपणीय माहिती लाखांदूर वनअधिकाºयांना मिळाली होती. दरम्यान अंतरगाव वन कंपार्टमेंट क्रमांक २७१ मध्ये शेतातील बांधाजवळ झाडे कापून ठेवल्याचे दिसून आले. हा प्रकार वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी असल्याची शंका वन कर्मचाऱ्यांना आली.
त्या आधारावर वनकर्मचारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व वनमजुरांनी जंगलात पाळत ठेवली होती.
दरम्यान, सोमवारला पहाटेच्या सुमारास जंगलात काही माणसांचा आवाज येताच वनकर्मचारी आवाजाकडे लक्ष ठेऊन दबा धरून बसून होते. तितक्यात एक मोठे चितळ जाळ्यात अडकून पडताच सहा शिकारी भाला व कुऱ्हाडीने वार करीत होते. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी धाड घातली असता काही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले तर एका आरोपींच्या सांगण्यावरून सहा आरोपींना अटक करण्यात आली. चितळ जाळ्यात अडकला त्यावेळी तो जखमी होता. परंतु पशुवैद्यकीय रूग्णालयात उपचारादरम्यान या मादी चितळाचा मृत्यू झाला. वनपरिक्षेत्राअधिकारी कार्यालय परिसरात शवविच्छेदन करण्यात आले असता गर्भावस्थेत असलेल्या या चितळाच्या पोटातून मृत पिल्लू बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या चितळाला जाळण्यात आले. याप्रकरणी सहा आरोपींविरूद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, २, (१६) (३५) (३६), ३९, ५०, ५१, व भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४२ (२) अन्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.
घटनेचा तपास उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनात साकोलीचे सहायक वनसंरक्षक एस. पी. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एस. दोनोडे, क्षेत्रसहायक व्ही.बी. पंचभाई, वनरक्षक बी.एस. मंजलवाड, एस.जी. जाधव, ए.जे. वासनिक, वनमजूर रामगडे, कुळसुंगे, वनव्यवस्थापन समितीेचे अध्यक्ष विद्वान नैताम यांनी केली.

लाखांदूर वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याची गोपणीय माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली. आता जंगलव्याप्त परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे.
- आर. एस. दोनोडे,
वनपरिक्षेत्र अधिकारी लाखांदूर.

Web Title: Chitala hunting in Lakhandur forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.