‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:36 AM2021-07-28T04:36:57+5:302021-07-28T04:36:57+5:30
भंडारा : कोरोना संकटाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. विशेषत: राज्य शासनाने विविध विभागात कोरोनामुळे पदभरतीला ब्रेक लावला ...
भंडारा : कोरोना संकटाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. विशेषत: राज्य शासनाने विविध विभागात कोरोनामुळे पदभरतीला ब्रेक लावला आहे. त्यामुळे शिक्षित असूनही नोकरी, रोजगार नाही, अशी स्थिती तरूणाईची आहे. परिणामी वय झाले असताना लग्न करू शकत नाही आणि नोंदणी विवाहाचा तर प्रश्नच नाही, असे वास्तव्य आहे.
बॉक्स
सहा महिन्यांत नोंदणी अत्यल्प
यंदा जानेवारीपासून रजिस्टर नोंदणीला कमी-अधिक प्रमाणात ऑनलाईन नोंदणी होत आहे. दर दिवशी किमान एक जोडणी विवाह बंधनात अडकत आहेत. कोरोनामुळे संचारबंदी लागू असून सार्वजनिक विवाह सोहळ्यावर निर्बंध आहेत. गरीब, सामान्य कुटुंबात सुद्धा रजिष्टर मॅरेजला पसंती आहे. मात्र कोरोना संकटामुळे विवाह समारंभ कमी प्रमाणात होत आहे.
कोट
कोरोनाकाळात नक्कीच रजिष्टर नोंदणी माघारली. गत तीन वर्षाची तुलना केली तर या वर्षामध्ये विवाह नोंदणीचे प्रमाण सर्वाधिक कमी आहे. आता कोरोना संकट टळण्याचे संकेत पाहता नोंदणी काही प्रमाणात होत आहे.
- विवाह नोंदणी अधिकारी, भंडारा
कोट
कोरोना कधी जाईल याची प्रतीक्षा आहे. गत दीड वर्षांपासून रोजगाराचा पत्ता नाही. वय निघून जात आहे, काय करावे सुचत नाही. आता तरी कोरोना जाईल आणि नोकरी, कामधंदा शोधून लग्न लोईल, अशी अपेक्षा आहे.
- समीर वासनिक.
कोट
अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. नोकरी लागल्यानंतर लग्न करू, असे स्वप्न आहे. मात्र कोरोनामुळे शासकीय, खाजगीतही नोकरी नाही, असे किती दिवस प्रतीक्षा करावी, हे समजत नाही.
- शशिकांत वाहाणे.