सभापतींची निवड अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:10 PM2018-12-29T22:10:58+5:302018-12-29T22:11:28+5:30
येथील नगरपंचायतीच्या सभापतींची निवड अविरोध करण्यात आली. निवडीनंतर उमेदवारांनी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : येथील नगरपंचायतीच्या सभापतींची निवड अविरोध करण्यात आली. निवडीनंतर उमेदवारांनी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.
नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी भोला घनश्याम उईके, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी विक्रम रमेश रोडे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सुरेखा सुरेंद्र निर्वाण यांची निवड अविरोध करण्यात आली. त्यांनी नामांकन दाखल केल्यानंतर त्यांच्याविरोधात कुणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे ही निवडणूक अविरोध झाल्याचे घोषीत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ज्योती निखाडे, उपाध्यक्ष माया निंबेकर, नगरसेवक मनोज टहिल्यानी, महेश आकरे, ईश्वरदत्त गिऱ्हेपुंजे, धनंजय तिरपुडे, धनू व्यास, साधना वंजारी, शिला भिवगडे, कल्पना भिवगडे, गीता तितीरमारे, कौस्तूभ भांडारकर, दिपाली जांभुळकर, संगीता पारधी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी सुधीर गौर यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी कांचन गायकवाड, लोकेश कटरे, सुरेश हटवार यांनी त्यांना सहकार्य केले. या निवडीनंतर सभापतींची विजयी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिक उपस्थित होते.