काेराेनाबाबत नागरिकांची बेफिकिरी, प्रशासनाकडून मात्र कठाेर उपाययाेजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:41 AM2021-02-20T05:41:27+5:302021-02-20T05:41:27+5:30

भंडारा : विदर्भासह राज्यात काेराेना संसर्गात वाढ हाेत असल्याचे दिसत असले तरी भंडारा जिल्ह्यात मात्र नागरिक काेराेनाबाबत बेफिकिर असल्याचे ...

Citizens' indifference towards Kareena, but strict measures taken by the administration | काेराेनाबाबत नागरिकांची बेफिकिरी, प्रशासनाकडून मात्र कठाेर उपाययाेजना

काेराेनाबाबत नागरिकांची बेफिकिरी, प्रशासनाकडून मात्र कठाेर उपाययाेजना

Next

भंडारा : विदर्भासह राज्यात काेराेना संसर्गात वाढ हाेत असल्याचे दिसत असले तरी भंडारा जिल्ह्यात मात्र नागरिक काेराेनाबाबत बेफिकिर असल्याचे जाणवत आहे. सर्व नियम पायदळी तुटवत व्यवहार सुरु आहे. अशा प्रकाराला पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित मार्गदर्शक सूचनासह प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात हा आदेश लागू करण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत काेराेना रुग्णांची संख्या कमी आहे. ही जिल्ह्यासाठी सुदैवाची बाब आहे. मात्र पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गत आठ दिवसांपासून काेराेना रुग्ण संख्या वेगाने वाढायला लागली आहे. भंडारा शहरातही गत चार दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत अंशत: वाढ झाल्याचे दिसत आहे. सर्वत्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त हाेत असताना भंडारा जिल्ह्यातील नागरिक मात्र बिनधास्त दिसत आहे. शहरासह ग्रामीण भागात बहुतांश नागरिक विना मास्क फिरतांना दिसत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडाल्याचे दिसत आहे. एसटी बससह सर्व प्रवासी वाहनात खचाखच गर्दी असते. जणू भंडारा जिल्ह्यातून काेराेना हद्दपार तर झाला नाही ना. अशी शंका नागरिकांच्या व्यवहारावरुन येत आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यात पुन्हा काेराेनाचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. त्यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांनी १८ जानेवारी राेजी सुधारित प्रतिबंधात्मक आदेश जारी केला.

या आदेशात धार्मिक उत्सव, यात्रा, समारंभ, महाेत्सव, सभा, बैठका केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मिरवणूक, रॅली काढण्याला मज्जाव करण्यात आला आहे. सांस्कृतिक, राजकीय व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमात माेठ्या प्रमाणावर एकत्रित जमावावर प्रतिबंध करण्यात आला. अंत्यसंस्कारात २० पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहण्यावर निर्बंध आणले आहे. लग्नसाेहळ्यातही ५० व्यक्तींची मर्यादा पूर्वीप्रमाणेच घालून देण्यात आली आहे. तसेच हाॅटेल, पानटपरी, चाैपाटी व सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त सर्व यात्राही रद्द करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिला आहे.

साकाेली येथील आठवडी बाजार बंद

n साकाेली : नगर परिषदेच्यावतीने रविवारी भरत असलेला आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याची माहिती नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पत्रपरिषदेत दिली. सध्यास्थितीत काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने कठाेर उपाययाेजना करण्याचे निर्देश देण्यात आले. नगर परिषद हद्दीत वावरत असताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले असून तसे न केल्यास प्रथम कारवाईमध्ये २०० रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास ५०० रुपये दंड तिसऱ्यांदा थेट कारवाईचे निर्देश दिले आहे. पत्रपरिषदेला नगराध्यक्ष धनवंता राऊत उपस्थित हाेत्या.

Web Title: Citizens' indifference towards Kareena, but strict measures taken by the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.