राष्ट्रसंतांच्या नावावर नागरिकांची लुबाडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:06 AM2018-01-28T00:06:08+5:302018-01-28T00:06:44+5:30
बुवाबाजी करणाºया पंड्याने स्वत:चे रक्षण करण्याकरिता संताचे पांघरुण घालून राष्ट्रसंतांची अवमानना करून नागरिकांना लुबाडण्याचा गोरखधंदा मागील अनेक वर्षापासून परसवाडा येथे राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप गावातील पवन खवास, आशिष भगत, नीळकंठ सिंगाडे, नितेश पाटील या तरुणांनी पत्रपरिषदेत केला आहे.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : बुवाबाजी करणाऱ्या पंड्याने स्वत:चे रक्षण करण्याकरिता संताचे पांघरुण घालून राष्ट्रसंतांची अवमानना करून नागरिकांना लुबाडण्याचा गोरखधंदा मागील अनेक वर्षापासून परसवाडा येथे राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप गावातील पवन खवास, आशिष भगत, नीळकंठ सिंगाडे, नितेश पाटील या तरुणांनी पत्रपरिषदेत केला आहे.
तुमसर तालुक्यातील परसवाडा (खापा) येथे जय गुरुदेव मानव सेवा आश्रम नावाची स्वतंत्र ट्रस्ट आहे. या ट्रस्टचे संचालक नाना कांबळे आहेत. सन १९९५ पूर्वी या महाराजांना अंगात देवी यायची. ते डोळ्यातून तांदूळ बुवाबाजी करून समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचा काम परसवाडा गावातूनच करीत होते. त्यावेळी ते प्रसिद्ध झाले होते.
दरम्यान सन १९९५-९६ च्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनचे श्याम मानव यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात नाना महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल केला व महाराजांचे पितळ उघडे पडले. त्यानंतर या महाराजांनी बुवाबाजीला पांघरून घालत संत लहरीबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाचा आसरा घेत नवीन गोरखधंद्याला सुरुवात केली. स्वयंघोषित संत बनून ते नाना महाराज म्हणून प्रसिद्धी मिळविण्यासाठी संतांच्या नावावर सप्ताह आयोजित करीत आहेत. लोकांचा घोळका जमविण्याकरिता बॅनर होर्डींग लावून संत असल्याचे भासवून आश्रमात हवन आदीचे पूजापाठ करवित आहेत. त्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवित असल्याचा आरोपही या तरूणांनी केला.
संत महात्मे हे लोकांना चांगले उपदेश, चांगले वर्तन व सेवाभाव याविषयीचे धडे दिले. मात्र इथे त्यांचा विपरित घडत आहे. इतकेच काय तर संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीता पुस्तकावर आपला फोटो लावून राष्ट्रसंतांची अवमानना करीत आहे.
गावात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. गावातील लोक सैरावैरा पाण्यासाठी होतात. मात्र या महाराजांना कधीच पाझर फुटत नाही व आश्रमातून एक थेंबही पाणी गावकऱ्यांना घेऊन जावू देत नाही. हे संतांचे कार्य आहेत का? असा प्रश्नही उपस्थित करून राजकीय पदाधिकाºयांनी दिलेल्या निधीचा फायदा कसा करतो व नागरिकांची लुबाडणूक करतो याविषयी काही उदाहरणादाखल सांगितले.