नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी स्वेच्छेने पुढे येण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:34+5:302021-09-24T04:41:34+5:30

पवनी तालुक्यातील भुयार येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड बाबत जनजागृती तसेच ...

Citizens need to come forward voluntarily for corona vaccination | नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी स्वेच्छेने पुढे येण्याची गरज

नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी स्वेच्छेने पुढे येण्याची गरज

Next

पवनी तालुक्यातील भुयार येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड बाबत जनजागृती तसेच महिलांना रोजगाराच्या संधी मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी सरपंच विलास बांडेबुचे, उपसरपंच रामभाऊ भोयर, ग्राम ग्रामपंचायत सदस्य सुधाकर नागपुरे, आशिष रामटेके, पर्यवेक्षिका नेहा ईरपाते, पवनी येथील नवदिशा लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक लीलाधर शिवरकर, सहयोगीनी मनीषा वाघमारे, नीलू जीभकाटे, गाव प्रतिनिधी कल्याणी देव्हाडे, वैशाली कापगते, बचत गटातील महिला व नागरिक उपस्थित होते.

यानंतर मार्गदर्शात जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी कोरोना लस घरबसल्या नांदनी केल्यानंतर घेता येते. तसेच महिलांसाठी रोजगाराच्या असलेल्या संधी व विविध शासकीय योजनांची माहिती, विविध कौशल्य प्रशिक्षणातून महिलांना कोणकोणते व्यवसाय सुरु करता येतील. दरमहा बचत कशी करावी, नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी महास्वयंम नोंदणी करून शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याविषयी मार्गदर्शन केले. साधन केंद्राच्या व्यवस्थापक लीलाधर शिवरकर यांनी महिलांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी व मास्क शिलाईचे काम तसेच कोविड बाबत घ्यावयाची दक्षता व जनजागृती करुन नागरिकांतील भीती कमी करणे तसेच स्थानिक पातळीवर लसीकरण नोंदणीचे आवाहन केले. ही मोहीम माविम व युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने पवनी, मोहाडी, लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये राबविण्यात येत आहे. संचालन नवदिशा लोकसंचालित साधन केंद्र, पवनीच्या व्यवस्थापक लीलाधर शिवरकर यांनी केले. प्रास्ताविक वैशाली कापगते यांनी केले तर आभार सहयोगिनी मनीषा वाघमारे यांनी मानले.

बॉक्स

पोषण आहारावर विशेष लक्ष द्या

कोरणानंतर प्रत्येकाची जीवनपद्धतीच बदलून गेली आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून विशेष करून महिलांनी कुटुंबासाठी पोषण आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी परिसरातील रानभाज्या, दूध, मोड आलेले कडधान्य तसेच शक्य असल्यास फळांचा आहार घेण्याची गरज आहे. आज स्वतःच्या भविष्यातील बचतीबरोबरच आरोग्यही महत्त्वाचे असल्याने महिलांना आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Citizens need to come forward voluntarily for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.