लसीकरणासाठी नागरिकांनी स्वतःहुन पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:27 AM2021-04-29T04:27:32+5:302021-04-29T04:27:32+5:30
लसीकरण न झालेल्या लोकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यासाठी तयार करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. १ मेपासून सुरू ...
लसीकरण न झालेल्या लोकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यासाठी तयार करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
१ मेपासून सुरू होणारे मोठ्या प्रमाणावरचे लसीकरण लक्षात घेता, ४५ वयावरील व्यक्तींचे लसीकरण लवकर व्हावे व गर्दी होऊ नये म्हणून नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या सूचनेनुसार विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
१ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील १० ठिकाणांबाबत चर्चा करून, ती स्थाने निश्चित करण्यात आली. कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालय प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले. निर्धारित वेळेत शहरातील दुकाने बंद होतात की नाही, याकडे काटेकोरपणे लक्ष द्या व पालन होत नसेल तर अशा व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याची सूचना खासदारांनी दिली. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोधमोहिम अधिक वेगाने राबविण्याचेही सांगण्यात आले. नागरी आरोग्य सुविधा केंद्रात कोरोना रुग्णांसाठी ओपीडी सुरू करून रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जावे, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विनोद जाधव, आशु गोंडाणे, सभापती भूमेश्वरी बोरकर, साधना त्रिवेदी, गटनेते विनायमोहन पशीने, शमीम शेख, कैलास तांडेकर, मकसूद अ. खान, मनोज बोरकर तसेच विभागप्रमुख उपस्थित होते.