दोन दशकांपासून रस्ता, नालीसाठी नागरिकांचा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:00 AM2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:33+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येत असलेल्या तकीया वॉर्ड परिसरातील काही अंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम झालेले नाही. परिणामी रस्ते व नाली बांधकामासाठी नागरिकांचा स्थानिक प्रशासनाशी संघर्ष सुरु आहे. निवेदन देवूनही समस्या सुटत नसतील तर दाद कुणाकडे मागायची असा प्रश्नही रहिवासी विचारीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येत असलेल्या तकीया वॉर्ड परिसरातील काही अंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम झालेले नाही. परिणामी रस्ते व नाली बांधकामासाठी नागरिकांचा स्थानिक प्रशासनाशी संघर्ष सुरु आहे. निवेदन देवूनही समस्या सुटत नसतील तर दाद कुणाकडे मागायची असा प्रश्नही रहिवासी विचारीत आहेत.
गत दोन दशकांपासून प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत मैदामीलच्या मागे व नविन म्हाडा कॉलनी यादरम्यान असलेल्या रस्ते बनलेले नाहीत. परिणामी नाल्यांचेही बांधकाम झालेले नाही. यासंदर्भात तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना येथील रहिवाश्यांनी समस्या सोडविण्यासंदर्भात मागणीचे निवेदन दिले होते.
निवेदनात नमुद केल्याप्रमाणे प्रभागातील पाखमोडे यांच्या घरापासून ते लांबट यांच्या घरापर्यंत नविन पाणीपुरवठा जलवाहिनी घालण्यात यावी, तसेच याच मार्गावर नविन सिमेंट नाली व रस्त्याचे बांधकाम करुन द्यावे, अशी मागणी आहे. गत दशकांपासून याबाबत पालिकेला पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र समस्यांकडे पालिका पदाधिकारीही दुर्लक्ष करीत आहे. नाली नसल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असते. याचा सर्वात जास्त फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. पथदिव्यांची समस्याही भेडसावत आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात के. एम. मेश्राम, अंजू भांडारकर, सिंधू मते, लक्ष्मी मेश्राम, एन. के. साठवणे, सदानंद आगाशे, प्रणय मेश्राम, भजनकर आदींच्या स्वाक्षºया आहेत.
पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
दोन दशकांपासून नविन म्हाडा वसाहतजवळील समस्या आवासून उभ्या असतांना पदाधिकाºयांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. रस्ता व नालीसाठी पालकमंत्री ते पालिका पदाधिकाºयांपर्यंत निवेदन देवूनही त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.