नगर परिषदांचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:41 PM2019-01-01T22:41:39+5:302019-01-01T22:41:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्यशासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग द्यावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी नगरपरिषद व ...

City Council jam | नगर परिषदांचे कामकाज ठप्प

नगर परिषदांचे कामकाज ठप्प

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन : आजपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यशासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग द्यावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतीतील कामकाज ठप्प झाले आहे. शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर बुधवारपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशाराही आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. १५ डिसेंबर रोजी या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयासमोर निदर्शने व धरणे दिले. त्यानंतर २९ ते ३१ डिसेंबर पर्यंत काळ्या फिती लावून काम केले. मात्र त्यानंतरही शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. परिणामी मंगळवार १ जानेवारीपासून अत्यावश्यक सेवेसह बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीतील बहुतांश कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
भंडारा नगरपरिषदेतील २६८ कर्मचाऱ्यांपैकी २३९ कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आपल्या मागण्यांचे मुख्याधिकाऱ्यांना संघटनेचे सचिव प्रदीप पटेल यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी सतीष आठले, क्रिष्णा निखार, सुरेंद्र बन्सोड, खुशाल कळंबे, बाळकृष्ण लांजेवार, अशोक गोन्नाडे, कलाम शेख, नरेंद्र बांते, पद्माकर भुरे, देशमुख, पवनकर, टेंभुर्णे, निमकर, दुपारे, राऊत, मेश्राम, नेवारे, निनावे, लिमजे, खेडीकर, प्रभावती देशमुख, शेंद्रे, मोगरे, सार्वे, सोनवाने, महाकाळकर, शरद पानबुडे, सत्यमेश्राम, संग्राम कटकवार, ठाकरे, गजभिये, वैद्य, योगेश मेश्राम, कारेमोरे आदी उपस्थित होते. नगरपरिषद कार्यालयात मंगळवारी दिवसभर शुकशुकाट दिसत होता. नगरपरिषदेत विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत होते. शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर बुधवारपासून पाणीपुरवठा बंद करून अग्नीशमन विभागाच्या कामावरही बहिष्कार टाकण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला आहे.
तुमसरमध्ये पाणीपुरवठा प्रभावित
तुमसर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने शहरातील पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. या कामबंद आंदोलनात नगरपरिषदेचे बहुतांश कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे प्रदेश सचिव नासीर अली सय्यद, तुमसर शाखेचे कार्याध्यक्ष जमील शेख, देवेंद्र शेंदुर्णीकर, गणेश मेहर, किशोर पंचबुद्धे, कृष्णकांत भवसागर, कैलाश वर्मा, सुभाष वैद्य यांच्यासह सफाई मजदूर काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरनाथ रगडे, राजेश राणे, बरकत शेख, कुमार शेख सहभागी झाले आहेत.
लाखनी नगरपंचायत
लाखनी नगरपंचायतीचे कर्मचारी, संवर्ग अधिकारी, सफाई कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आंदोलन पुकारले आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी नगरपंचायत कार्यालयात शुकशुकाट दिसत होता. या आंदोलनात एल.आय. कटरे, जी.एम. कºहाड, सुरेश हटवार, भास्कर निर्वाण, हुमाशंकर क्षीरसागर, राजेश पडोळे, विनोद सपाटे, अजय सदनवार, मनोहर भाजीपाले, सुनील गायधनी, सीताराम भिवगडे, गणेश आंबीलकर, संदीप शेंडे, धीरेंद्र बोदले, सूरज बडगे, मनोज वैद्य, अजय भैसारे, गोपाल बागडे, विलास कांबळे, अनिल कांबळे, सुरेश मेश्राम, अमर बडोले, अश्विन शामकुवर, सुभाष लोखंडे, सुभाष लसुंते, पवन सपाटे, सुरेश रंगारी आदी सहभागी झाले आहेत.
पवनी नगरपरिषदेचे ५३ कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यासोबतच साकोली नगरपरिषदेसह मोहाडी आणि लाखांदूर नगरपंचायतचे कर्मचारीही या कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. लाखांदूर येथील आंदोलनात विजय करंडेकर, सतीष माकडे, रमेश कापगते, संतोष राऊत, मुन्ना कठाणे, विश्वास बोरकर आदी सहभागी झाले होते.
कामबंदचा नागरिकांना फटका
नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना नववर्षाच्या पहिल्या दिवशी बसला आहे. विविध कामांसाठी नागरिक येथे आले होते. परंतु त्यांना आल्यापावली परत जावे लागले. शहरातील विविध भागांची स्वच्छताही झाली नाही. इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. नागरिकांना कोणतेही दाखले मिळाले नाही. आता हा संप कोणते वळण घेतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठा योजना बंद करण्याचा इशारा दिल्याने भंडारा शहरात बुधवारपासून पाणी मिळण्याचीही शक्यता नाही. यामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Web Title: City Council jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.