दागिने चमकविण्याच्या नावावर साेन्यावर हात साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:38 AM2021-09-25T04:38:27+5:302021-09-25T04:38:27+5:30

सुरभी संदीप गाढवे यांच्या घरी गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दाेन अनाेळखी तरुण आले. सुरुवातीला त्यांनी तांबे, पितळीचे दागिने ...

Clean hands on Saenya in the name of shining jewelry | दागिने चमकविण्याच्या नावावर साेन्यावर हात साफ

दागिने चमकविण्याच्या नावावर साेन्यावर हात साफ

Next

सुरभी संदीप गाढवे यांच्या घरी गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दाेन अनाेळखी तरुण आले. सुरुवातीला त्यांनी तांबे, पितळीचे दागिने चमकवून देताे असे सांगितले. बाेलण्यात गुंतवून साेन्याचांदीचे दागिनेही साफ करून देताे असे सांगितले. त्यांच्या बाेलण्यावर विश्वास ठेवत सुरभी यांनी आपली काळ्या मण्याची गळसाेरी, एक डाेरले, चार नग साेन्याचे बारीक मणी त्या भामट्यांच्या हवाली केले. आपल्या जाऊची गरसाेळी व २४ नग साेन्याचे बारीक नगही त्यांना दिले. या भामट्यांनी गॅसवर उकळत्या पाण्यात दागिने साफ करून देताे असे सांगितले. माेठ्या चलाखीने गॅसवरील भांड्यात दागिने ठेवल्याचे भासवून या दाेन जावांचे दागिने घेऊन पळ काढला. काही वेळात हा प्रकार त्याचा लक्षात आला. याप्रकरणी कारधा पाेलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

बाॅक्स

भामटे २० ते २१ वयाेगटातील

सुरभी गाढवे यांना फसविणारे दाेन्ही भामटे २० ते २१ वयाेगटातील आहे. रंग गाेरा असून उंची पाच फूट २ इंट असून सळपातळ बांधा आहे. तर दुसरा तरुण काळा रंगाचा असून त्याची उंची पाच फूट आहे. अशा वर्णनाचे व्यक्ती आढळल्यास तत्काळ कारधा पाेलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Clean hands on Saenya in the name of shining jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.