स्वच्छता अभियान छायाचित्रापुरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:20 AM2017-11-16T00:20:20+5:302017-11-16T00:20:55+5:30

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम अभियान सुरु करण्यात आले.

Cleanliness campaign for photography | स्वच्छता अभियान छायाचित्रापुरते

स्वच्छता अभियान छायाचित्रापुरते

Next
ठळक मुद्देव्यथा लाखांदूर तालुक्यातील : अशाने कशी होणार स्वच्छता?

रवींद्र चन्नेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम अभियान सुरु करण्यात आले. पारितोषिक मिळविण्याच्या उद्देशाने का होईना ग्रामीण भागातील गावे स्वच्छ व सुंदर बनली होती. मात्र विद्यमान सरकारला स्वच्छ भारत अभियानाचा पुरता विसर पडला आहे.
लाखांदूर तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीच्या गावामध्ये जागोजागी अस्वच्छता दिसून येत आहे. बारव्हा परिसरातील जैतपूर, बारव्हा, तावशी, चिकना, कोदामेडी, चिचाळ आदी गावात सर्वत्र घाणच घाण दिसून येत आहे. गावातील नागरिकांनी घरातील सांडपाणी शोचखड्डे तयार करून साठवायचे असते. मात्र कुणाचीही तमा न बाळगता तो वर्दळीच्या रस्त्यावर टाकले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे. हातात झाडू घेऊन केवळ फोटो काढण्यापुरतेच स्वच्छता अभियान राबविल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा या महापुरुषांच्या नावाने सुरु केलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाचा आता अनेक गावांना विसर पडलेला दिसून येत आहे.
शौचालय बांधले, मात्र वापरावर प्रश्नचिन्ह
लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत ६३ ग्रामपंचायतीचा समावेश असून ७० ते ८० गावांचा समावेश आहे. या गावामध्ये स्वच्छ भारत अभियान १०० टक्के राबविण्याचे प्रमाणपत्र सर्व ग्रामपंचायतीला देण्यात आले. स्वच्छता अभियान राबविण्याच्या वेळेस वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढून कांगावा करण्यात आला. त्यानंतर या अभियानाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या अभियानाचा फज्जा उडाला. ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले. मात्र बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर होत आहे का? याची प्रत्यक्ष तपासणी झाल्याचे दिसून येत नाही. ग्रामीण भागात अजूनही उघड्यावर शौचास जाण्याचा प्रकार दिसून येत आहे. अनेकांनी शौचालयांना स्नानघर बनविले आहे.

Web Title: Cleanliness campaign for photography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.