कोरंभी देवस्थान परिसरात स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:06 PM2018-01-31T23:06:25+5:302018-01-31T23:06:53+5:30
कोरंभी देवी येथे माता पिंगलेश्वरी देवस्थान परिसरात जिल्हा कक्ष, ग्रामपंचायत व महिला बचत गटांच्या वतीने स्वच्छता व प्लास्टीक गोळा करून भाविक व पर्यटकांमध्ये प्लास्टीक बंदी व शाश्वत स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचा संदेश देण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : कोरंभी देवी येथे माता पिंगलेश्वरी देवस्थान परिसरात जिल्हा कक्ष, ग्रामपंचायत व महिला बचत गटांच्या वतीने स्वच्छता व प्लास्टीक गोळा करून भाविक व पर्यटकांमध्ये प्लास्टीक बंदी व शाश्वत स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचा संदेश देण्यात आला.
कोरंभी ग्रामपंचायतीला लागून व वैनगंगेच्या किनाऱ्यावर माता पिंगलेश्वरीचे देवस्थान आहे. धार्मिक व पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहणे. जेवनासाठी प्लास्टीक पत्रावळी, वाट्या, ग्लास, पाण्याच्या बॉटल तसेच पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात व याच ठिकाणी फेकून देतात. धार्मिक व पर्यटनस्थळावरील ही परिस्थिती भविष्यात आरोग्य व पर्यावरणासाठी धोकादायक असल्याने देवस्थान परिसरात स्वच्छतेचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ज्ञानेश्वर सपाटे, सरपंच हेमंत राखडे, सचिव घोडीचोर, जिल्हा कक्षाचे डी.एस. बिसेन, अजय गजापुरे, अंकुश गभणे, राजेश येरणे, प्रशांत फाये, गजानन भेदे, भूषण मुळे, ग्रामपंचायत सदस्य रुपये घुंगरे, महादेव कुंभरे, माया लुटे, सुरेखा वनवे, आदिशक्ती बचत गटाच्या शकुंतला राखडे, प्रिया शेंडे, मंदा सार्वे, धनलक्ष्मी बचत गटाच्या दिपाली सेलोकर, पुष्पा नेवारे, ललीता बाभरे, रायवंता नेवारे, बेबी नेवारे, संजय लुटे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता करण्यात आली.
मंदिर परिसरालगत असलेल्या कचरा कुंड्याची स्वच्छता करण्यात आली. ग्रामपंचायतपासून तर देवस्थानापर्यंत प्लास्टीकचा कचरा सामूहिक पद्धतीने उचलण्यात आला. मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्लास्टीकचा साचलेला कचरा गोळा करण्यात आला. तसेच वैनगंगेच्या किनाऱ्यावर साचलेला कचराही स्वच्छ करण्यात आला. प्लास्टीक व अन्य प्रकारचा कचरा गोळा करण्यासाठी पुढाकार घेण्यात आल्याने या ठिकाणी असलेले भाविक व पर्यटकांमध्ये स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करण्यात आला. कोरंभी देवस्थान परिसरात स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन प्लास्टीक बंदी व शाश्वत स्वच्छतेचा हा नाविण्यपूर्ण उपक्रम भविष्यात भागात परिवर्तनाचा मार्ग दाखविणारा आहे.
स्वच्छतेच मूलमंत्र जोपासा -माधुरी मडावी
आसगाव (चौ.) : स्वच्छता अंगी बाळगून स्वच्छता हाच धर्म मानून स्वच्छतेचा मुलमंत्र घरोघरी जोपासावा असा संदेश पवनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी स्मार्ट ग्रामउमरी (चौ.) येथे शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी द्वारा आयोजित श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. त्यांनी गावकºयांना घरातील स्वच्छता कशी करायची याबद्दल सांगताना, ओला व सुखा कचरा वेगवेगळा ठेवावे. खर्रा पन्नी, प्लास्टीक आदी रस्त्यावर ठेवू नये. खात, जनावरे, खुंट, अतिक्रमण आदी रस्त्यावर ठेवू नयेत. प्रसंगी गावचे सरपंच प्रमोद खरकाटे यांनी सुद्धा ग्रामवासी जनतेला संबोधन केले व गावात स्वच्छता बाळगण्याची हमी दिली. उमरी येथे विज्ञान महाविद्यालय पवनी यांचा स्वच्छ भारत मिशन या संकल्पनेवर आधारित उमरी येथे दहा दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिवसा गावातील गटारे, रस्ते, वृक्षांना पाणी देणे, मातीकाम करणे व रात्री व सांस्कृतिक कार्यक्रम ठरलेले होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा.डॉ.व्ही.व्ही. लेपसे, प्रमुख पाहुणे गावचे सरपंच प्रमोद खरकाटे, प्रा.संजय रायबेले, उपसरपंच राहुल सोनटक्के, ग्रा.पं. सदस्य भास्करराव हेमणे, निकीता हेमणे, शिल्पा माटे, माधुरी भुते, सुनिता वरंभे, पोलीस पाटील प्रफुल्ल सावरबांधे, एन.भुते, आनंदराव हेमणे, वरंभे, दिलीप हेमणे, गिरधर सावरबांधे, शामराव पिल्लेवान तथा ग्रामस्थ उपस्थित होते.