अड्याळमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:37 AM2019-02-23T00:37:30+5:302019-02-23T00:38:14+5:30

गत ३० वर्षापासून प्रलंबित असलेल्या अड्याळ तालुका निर्मितीसाठी परिसरातील नागरिक आता आक्रमक झाले असून शुक्रवारी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळून नायब तहसीलदार कार्यालयावर शेकडो नागरिकांचा मोर्चा धडकला.

Clogged sticks in the skin | अड्याळमध्ये कडकडीत बंद

अड्याळमध्ये कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देतालुका निर्मितीची मागणी : परिसरातील गावकऱ्यांचा मोर्चा, साखळी उपोषणाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : गत ३० वर्षापासून प्रलंबित असलेल्या अड्याळ तालुका निर्मितीसाठी परिसरातील नागरिक आता आक्रमक झाले असून शुक्रवारी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळून नायब तहसीलदार कार्यालयावर शेकडो नागरिकांचा मोर्चा धडकला. तसेच या मागणीसाठी शुक्रवारपासून साखळी उपोषणाला प्रारंभ झाला आहे.
अड्याळ तालुका निर्मितीसाठी नागरिकांनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटन दिला होता. मात्र त्यानंतरही कोणतीच घोषणा झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी अड्याळ तालुका निर्मिती कृती समिती व गावकºयांच्या नेतृत्वात सकाळी ११.३० वाजता मोर्चा काढण्यात आला. अड्याळ येथील मंडईपेठ येथून निघालेला हा मोर्चा गावातील विविध मार्गावरून जात नायब तहसीलदार कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी विविध घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकºयांनी आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार मयुर चौधरी यांना दिले. तसेच तालुका निर्मितीसाठी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठ बंद होती.
तालुका निर्मितीसाठी शुक्रवारपासून अड्याळ येथे साखळी उपोषणाला प्रारंभ झाला. या उपोषणात देवराव तलमले, सुधाकर मुलकलवार, हरिश्चंद्र वासनिक, राजू फुलबांधे, बिपिन टेंभुर्णे, गजानन नखाते, अमोल उराडे, प्रशांत शहारे हे ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
अड्याळला पुर्वी विधानसभा क्षेत्राचा दर्जा होता. मोठी बाजारपेठ आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अनेक लहान मोठे गावे अड्याळला जोडलेली आहेत. अशा या गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी गत ३० वर्षापासून नागरिक आंदोलन करीत आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते आमदारापर्यंत सर्वांना निवेदने दिली. परंतु अद्यापपर्यंत तालुका निर्मितीचा प्रश्न कायम आहे. यापुर्वी गावकºयांनी प्रशासनाला अल्टीमेटम दिला होता. तसेच राजकीय पुढाºयांनाही गावबंदी करण्यात आली आहे. आता प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Clogged sticks in the skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा