कोका फिडरवरील १६ तासांचे भारनियमन बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:34 PM2017-09-14T22:34:46+5:302017-09-14T22:35:03+5:30

मोहाडी तालुक्यातील कोका फिडरवर करडी विद्युत वितरण कंपनीकडून १६ तासांचे भारनियमन सुरू आहे.

Close the 16-hour load on the coca feeder | कोका फिडरवरील १६ तासांचे भारनियमन बंद करा

कोका फिडरवरील १६ तासांचे भारनियमन बंद करा

Next
ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : मोहाडी उपविभागीय विद्युत अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील कोका फिडरवर करडी विद्युत वितरण कंपनीकडून १६ तासांचे भारनियमन सुरू आहे. त्यामुळे परिसरातील शेतकºयांबरोबर विद्यार्थी व नागरिकही त्रस्त आहेत. अत्यल्प पावसामुळे हजारों एकर शेती पडीत आहे. आठ तासाच्या विद्युत पुरवठ्यात रोवणी झालेले धान पिकवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोका फिडर न्यू नागझिरा व वन्यजीव अभयारण्याच्या पायथ्याशी आहे. या भागात जंगली श्वापदांचा वावर दिवसरात्र असतो. मागील वर्षी ढिवरवाडा गावात एका मुलाचा बळी बिबट्याने घेतला. जांभोरा, केसलवाडा, कान्हळगाव, बोंडे, खडकी, पालोरा, लेंडेझरी, किसनपूर, दुधारा, कोका, सर्पेवाडा, इंजेवाडा, चंद्रपूर या गावांमध्ये वाघाच्या अस्तित्वाच्या खाणाखुना नेहमीच आढतात. रोज या भागातील पाळीव प्राण्यांचा बळी वन्यप्राण्यांकडून घेतला जातो. शेतशिवाराची तर धुळधान झाली आहे. रात्रंदिवस शेतावर शेतकºयांना गस्त करावी लागते. परिसरात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतीचे बेहाल आहेत. नाले, तलाव कोरडे आहेत. त्यातच भारनियम वाढल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडल्यासारखी अवस्था आहे. विद्युत अभावी डोळ्यादेखत पिके करपताना पाहून शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. शेतीची दैनावस्था शेतकरी पाहू शकत नाही. या भागात सिंचनाच्या कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे परिस्थिती भीषण झाली आहे.
राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे राज्यात विद्युत सरप्लस असल्याचे सांगत सुटले असताना भारनियमन का केले जात आहे. भारनियमनाची समस्या त्वरीत सोडविण्यात यावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी यादोराव मुंगमोडे, माजी उपसरपंच ताराचंद समरीत, विश्वनाथ गोबाडे आदी शेतकºयांनी मोहाडी उपविभागीय विद्युत अभियंता, तहसिलदार यांना दिला आहे.

Web Title: Close the 16-hour load on the coca feeder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.