मारहाणीच्या निषेधार्थ अड्याळ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:02 AM2018-07-10T00:02:15+5:302018-07-10T00:02:35+5:30
जनावरांची कत्तलखान्यात रवानगी करणारे वाहन ग्रामस्थांनी पकडल्यानंतर अवैध तस्करांनी ग्रामस्थांनाच मारहाण केली. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज सोमवारला अड्याळवासीयांनी कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर अड्याळ व परिसरातील हजारो नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले.
विशालरणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : जनावरांची कत्तलखान्यात रवानगी करणारे वाहन ग्रामस्थांनी पकडल्यानंतर अवैध तस्करांनी ग्रामस्थांनाच मारहाण केली. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज सोमवारला अड्याळवासीयांनी कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर अड्याळ व परिसरातील हजारो नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन दिले.
पोलीस प्रशासनाने आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली परंतु या मारहाणीत काही महिला व मुख्य आरोपी बाबु पटेल यांचा समावेश असतानाही समाधारकारक कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे महिलांनी अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. ही घटना घडली तेव्हापासून दोन दिवसात भंडारा जिल्ह्यातील ७२ गोतस्करांवर कार्यवाही करण्यात आली. या घटनेनंतर जिल्हा पोलीस एवढी मोठ्या प्रमाणात कारवाई करतात आधीच हे धाडसत्र सुरू असते तर ही घटना घडली असती का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
अड्याळ व परिसरात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. त्यांच्याकडून चिरीमीरीची मोठी देण दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, सौंदड, खापरी पुनर्वसनवासियांनी रविवारला रात्री घेतलेल्या बैठकीत विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व ग्रामवासीय सहभागी होते. या बैठकीत गो-तस्करी व घरात घुसून महिलांना मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून जिल्ह्यतून तडीपार करण्यात यावे,
पोलीस ठाण्यात आलेल्या ग्रामस्थांवर लाठीमार करण्यात आला. तो आदेश कुणी दिला? मुख्य आरोपी मोकाट का? घटनेच्या दिवशी कर्तव्यावर असणाºया पोलीस कर्मचाºयांना निलंबित करा आणि जखमींना शासकीय मदत देण्यात यावी, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
हा तर आरोपींनी केलेला सामूहिक हल्ला
गो-तस्करीचा अवैध व्यवसाय संपूर्ण भंडारा जिल्हाभर सुरु आहे. हा व्यवसाय करणाºयांमध्ये गुंड प्रवृत्तीचा लोकांचा समावेश आहे. हे अवैध व्यवसाय पोलीस प्रशासनाच्या पाठबळाने सुरु बिनदिक्कतपणे सुरू आहेत. अड्याळ येथील घटना आरोपींनी ग्रामस्थांवर केलेला सामूहिक हल्ला आहे. या प्रकरणातील संपूर्ण आरोपींना अटक करण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चमूकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय एकाुपरे यांनी केली.