गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:59 PM2019-05-27T22:59:30+5:302019-05-27T23:00:23+5:30

नीक खरेदी विक्री सहकारी संस्थेद्वारे उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी रखडल्याने तप्त उन्हात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लाखनी खरेदी केंद्रावर १७ मे पासुन दोन हजार ४३ क्विंटल उन्हाळी धान खरेदी झाली असून अजुनही पाच हजार क्विंटल धान लाखनी गोदामांच्या बाहेर उघड्यावर पडून आहे. धान खरेदी बंद असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

Closing the purchase of summer paddy without delay | गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी बंद

गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी बंद

googlenewsNext
ठळक मुद्देपाच हजार क्विंटल धान केंद्रावर पडून : खरीप धानाचीही उचल नाही, लाखनी येथील प्रकार

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : स्थानीक खरेदी विक्री सहकारी संस्थेद्वारे उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी रखडल्याने तप्त उन्हात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लाखनी खरेदी केंद्रावर १७ मे पासुन दोन हजार ४३ क्विंटल उन्हाळी धान खरेदी झाली असून अजुनही पाच हजार क्विंटल धान लाखनी गोदामांच्या बाहेर उघड्यावर पडून आहे. धान खरेदी बंद असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
खरेदी-विक्री संस्थेद्वारे सहा धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. लाखनी केंद्रावर २०४३ क्विंटल, सालेभाटा केंद्रावर १८१२ क्विंटल, कनेरी, गोंडेगाव, गुरढा ह्या गावासाठी असलेले जवेनाळा खरेदी केंद्रावर २६७ क्विंटल, एकोडी धान खरेदी केंद्रावर २६८५ क्विंटल, परसोडी सौदंड धान खरेदी केंद्रावर २६८५ क्विंटल, सातलवाडा खरेदी केंद्रावर ४७.२० क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. गोदामाअभावी धान खरेदी थांबली आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. पावसाळी धानाची उचल अद्यापही झालेली नसल्यामुळे गोदाम भरलेले आहेत. नवीन माल ठेवण्यासाठी गोदाम नाही. जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना याबाबत माहिती दिली आहे. खरेदी विक्री संस्थेद्वारे सेवा सहकारी संस्था, बाजार समिती व काही खासगी गोदामाचा वापर धान ठेवण्यासाठी केला जातो.
खरेदी विक्री संस्थाद्वारे खरीप हंगामात १ लाख १२ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आला. यापैकी ४० टक्के धानाची उचल झाली आहे. तर ६० टक्के धान गोदामात पडून आहे. खरीप धानाची उचल झालेली नसल्यामुळे उन्हाळी धान गोदामासमोर पडून आहे.
उन्हाळी धानाला १७५० रुपयांचा भाव शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्रावर दिला जातो. गरजवंत शेतकरी आपला धान कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना विकतांना दिसून येत आहे.
शासन शेतकºयांच्या हिताच्या योजना तयार करीत असते. त्यात परिपुर्णतेचा अभाव आहे. अनेक शेतकरी उन्हाळी धानाकडे वळले आहे. ठोकळ धानाचे उत्पादन वाढले आहे. शेतकऱ्याच्या उन्हाळी धान उत्पादनाकडे कल वाढल्याने शासनाने धान खरेदी करण्याच्या यंत्रणेत वाढ करणे आवश्यक आहे. गोदामाची कमतरता जाणवत आहे.
निकृष्ट दर्जाचे गोदाम
अनेक गोदाम निकृष्ठ प्रतीचे आहे. पावसाळ्यात पाणी गळत असते. गोदामात उंदीर, घुशीचा त्रास असतो. मालाची उचल लवकर होत नसल्याने मालात तुट निर्माण होते व त्याचा फटका खरेदी-विक्री संस्थेला बसतो. मागील वर्षी सहा महिन्यापर्यंत मालाची उचल केलेली नसल्याने खरेदी विक्री संस्थेला १२ लाख रुपयाची तुट सहन करावी लागली होती.

गोदाम उपलब्ध करण्याबाबत आमदारांशी चर्चा केलेली आहे. खरीप धानाची उचल झालेली नाही. त्यामुळे गोदामाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो क्विंटल धान खरेदी विक्रीच्या केंद्रावर पडुन आहे. अनेक शेतकरी ओला धान खरेदी केंद्रावर आणतात व खरेदी करण्याबाबत बळजबरी करतात. धान खरेदी केल्यानंतर ते धानाची उचल करण्यापर्यंत धानाच्या मोजमापात तुट दिसून येते. यामुळे खरेदी विक्रीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.
- घनश्याम खेडीकर,
सभापती खरेदी-विक्री सहकारी संस्था

Web Title: Closing the purchase of summer paddy without delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.