कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ बंद; तिसर्या दिवशीही जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चा, रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:35 AM2018-01-05T01:35:51+5:302018-01-05T01:36:07+5:30
बुलडाणा : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ४ जानेवारी रोजीही बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. तसेच विविध संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदने देऊन सदर घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ४ जानेवारी रोजीही बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. तसेच विविध संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदने देऊन सदर घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
डोणगाव : कडकडीत बंद
डोणगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध म्हणून भारत मुक्ती मोर्चा या बहुजनवादी संघटनेच्यावतीने ४ जानेवारीला डोणगाव येथे बंद पाळण्यात आला.
या बंदला डोणगावातील नागरिक, व्यापार्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती, तर भारत मुक्ती मोर्चा, सम्राट अशोक मित्र मंडळ, सिद्धार्थ नवयुवक मंडळ, पंचशील नवयुवक मंडळ, यशोधरा महिला मंडळ, माता रमाई महिला मंडळ यांनी संपूर्ण गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला. गुरुवारी ५ वाजेपर्यंत १00 टक्के बंद पाळण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार आकाश शिंदे, पीएसआय विलास मुढेंसह मेहकर येथील दंगाकाबू पथक, बुलडाणा येथील ट्रॅकिंग फोर्स, डोणगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी ४ वाजता भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्यावतीने तहसीलदार संतोष काकडे यांना निवेदन देऊन सदर घटनेतील दोषींवर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
धा.बढे : निषेध रॅली
धामणगाव बढे : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ 0४ जानेवारी रोजी धामणगव बढे येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला. यावेळी गावातून निषेध रॅली काढून ग्रामपंचायत धा.बढे प्रांगणात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी धामणगाव बढे ठाणेदारामार्फत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या निषेध सभेप्रसंगी लक्ष्मणराव गवई, रवी शंकर मोदे , अँड. गणेश सिंग राजपूत, किशोर मोदे, भीमराव शिरसाट, विश्वनाथन हिवाळे, सुधाकर सोनोने, बिस्मिल्लाह कुरैशी, एकनाथ होडगरे, अविनाश मोदे, असलम पठाण, दिनकर बढे, गजानन घोंगडे, रामदास चौथनकर, किसन इंगळे, अहिरे, भास्कर हिवाळे, गजानन हिवाळे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मयूर चव्हाण, आकाश हिवाळे, अशांत हिवाळे, सागर हिवाळे गजानन चव्हाण, उदय हिवाळे, प्रेम इंगळे, अरुण इंगळे, रमाकांत चव्हाण शशिकांत चव्हाण, शाहीर अरुण, कैलास गवई, अरुण सोनोने, श्रीराम अवचार, भास्कर गवई यांनी परिश्रम केले. संचालन एस. पी. अहिरे यांनी केले, तर आभार दीपक हिवाळे यांनी मानले.
उंद्री येथे बंद
उंद्री : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी उंद्री येथे बंद पाळण्यात आला. भूमी मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप आंभोरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सभेला सुभाष कटारे, राम डहाके, अनिसखा पठाण, अँड. राहुल धुरंधर, मुकेश भंडारे, राहुल पैठणे, रमेश पाटील, संजय धुरंधर, जलील खान, बुठन भाई, अश्वजित साळवे, लाला सपकाळ, नीलेश चिंचोले, मिलिंद वानखेडे, निर्मल भंडारे, संदीप वानखेडे, गजानन चिंचोले, भिकाजी गवई, प्रमोद आराख, दीपक अंभोरे, प्रभाकर पाटील, बबन डोंगरी, गोलू लाहुडकर, दगडू पवार आदी हजर होते.
सुलतानपूर येथे रास्ता रोको
सुलतानपूर : येथील राज्य महामार्गावर भारिप-बमसं व रिपब्लिकन सेनेच्यावतीने मंगळवारी वाहतूक बंद करीत रास्ता रोको करण्यात आला. तसेच गावातील वैद्यकीय सेवा वगळता सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून कोरेगाव भीमा घटनेचा निषेध नोंदविला.
या बंद व रास्ता रोकोमध्ये गावातील सर्व समाज बांधवांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग दर्शवला. आपापली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. यावेळी शिवाजी पनाड, आदित्य घेवंदे, संजाब पनाड, सुरेश मोरे, विजय मोरे, राहुल पनाड, महेश मोरे, शे.नशीर, प्रवीण सरकटे, अनिल पवार, अरुण नवघरे, अनिल जाधव, नागसेन पनाड, गौतम पनाड, कावेरी पनाड, केसर गवई, कमल शेजुळ, चंद्रभागा घेवंदे, कल्पना मोरे, अलका पनाड, भानदास पवार, अशोक जावळे, दीपक आनंदराव, किरण वानखेडेसह महिला पुरुषांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार डाके, पाटील, म.अ. चव्हाण, तलाठी दांदडे, पोउनि भालेराव, बिट जमादार सोनोने, पोकाँ सानप आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
रिपब्लिकन पँथरच्यावतीने निषेध
मेहकर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेचा रिपब्लिकन पँथरच्यावतीने उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांना मंगळवारी निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
सदर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पँथरचे डॉ. राहुल दाभाडे, गौतम अवसरमोल, भारतीय बौद्ध महासभेचे विकास पवार, रोहित सोळंके, उज्ज्वल अंभोरे, कपिल इंगळे, अक्षय खंडारे, सागर गवई, मंगेश वानखेडे आदी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.