फटाक्याच्या पैशातून ‘सुकन्यां’नी दिले गरजुंना कपडे

By admin | Published: November 3, 2016 12:44 AM2016-11-03T00:44:49+5:302016-11-03T00:44:49+5:30

दिवाळी हा आनंदाचा सण, नवनवीन कपडे, गोडधोड पदार्थ व फटाक्यांची आतीषबाजी होय.

The clothes of the needy 'dry clothes' given by the fireworks money | फटाक्याच्या पैशातून ‘सुकन्यां’नी दिले गरजुंना कपडे

फटाक्याच्या पैशातून ‘सुकन्यां’नी दिले गरजुंना कपडे

Next

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी : समाजासमोर ठेवला वेगळा आदर्श
लाखांदूर : दिवाळी हा आनंदाचा सण, नवनवीन कपडे, गोडधोड पदार्थ व फटाक्यांची आतीषबाजी होय. परंतु फटाक्याच्या आतीषबाजीने होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव ठेवून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प पिंपळगाव येथील टेंभुर्णे परिवारातील मुलींनी घेतला आणि फटाक्यावर होणाऱ्या खर्चातून गरजु मुलांना कपडे भेट देवून दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला. हा त्यांचा द्वितीय वर्ष असून मागील वर्षी शालेयपयोगी वस्तु भेट दिल्या होत्या.
दिवाळीत होणाऱ्या फटाक्यांच्या आतीषबाजीने ध्वनी प्रदूषण होते. तर धुरामुळे हवेतील प्रदूषण वाढते. त्याचा दुष्परिणाम हा आजारी लोक व लहान मुलांवर अधिक होत असतो, या प्रदूषणामुळे अनेक श्वसनाचे आजार होतात. तसेच फटाक्यांवर हजारो रूपये खर्च करून आपण स्वत:च्याच आरोग्याशी खेळत असतो, याची जाणीव लक्षात घेता, पिंपळगाव येथील दयाराम टेंभुर्णे यांच्या पे्ररणेने दिया टेंभुर्णे, रोहिणी, श्रृती, खुशी, मृणाली टेंभुर्णे, प्रिया भैसारे यांनी फटाके न फोडता त्याच पैशातून गरजु मुलांना कपडे भेट देण्याचा ठरवून गावातीलच गरजु मुलींना कपडे भेट म्हणून दिले.
त्यांच्या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी गरजु मुलांना शालेयपयोगी वस्तु भेट देवून दिवाळी साजरी केली होती.
या उपक्रमात दिया टेंभुर्णे हीने पुढाकार घेतला. दिया ही नवोदय विद्यालयाची वर्ग ७ ची विद्यार्थीनी असून असा उपक्रम आपण अविरत सुरू ठेवू, असे मत दियाने व्यक्त केला. तर तिच्या या उपक्रमाचे गावात सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे. समाजात सर्वांनी पुढाकार घेतल्यास सर्वांची दिवाळी नक्कीच आनंदात जाईल. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The clothes of the needy 'dry clothes' given by the fireworks money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.