कापड दुकानाला आग; ३० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:29+5:302021-01-08T05:53:29+5:30
व्हेरायटी क्लाॅथ स्टोअर्स व साडी सेंटरचे मालक अशफाक लद्धानी यांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून ते ...
व्हेरायटी क्लाॅथ स्टोअर्स व साडी सेंटरचे मालक अशफाक लद्धानी यांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले. जेवण करून झोपी गेले असता मध्यरात्री इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे गच्चीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. दुकान मालक लद्धानी यांनी दुकानाचे शटर उघडताच पीओपीसह कापड जळताना आढळून आले. शटर उघडल्यामुळे हवेने आगीने रौद्र रुप धारण केले. घटनेची सूचना भंडारा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास दिली.
लगेच दुकानाजवळ असलेल्या किशोर खेडीकर यांच्या बोअरवरून पाईपने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, आगीत दुकानातील कापड, साड्या, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत ३० लाख रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज दुकान मालकाने वर्तविला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.