एलआयसीला ग्राहक मंचाची चपराक

By admin | Published: December 25, 2014 11:27 PM2014-12-25T23:27:27+5:302014-12-25T23:27:27+5:30

विमा धारकाचा मृत्यूनंतर वारसदाराला विमा रकम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय जिवन विमा निगमला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चपराक दिली.

Clutter of Customer Forum to LIC | एलआयसीला ग्राहक मंचाची चपराक

एलआयसीला ग्राहक मंचाची चपराक

Next

भंडारा : विमा धारकाचा मृत्यूनंतर वारसदाराला विमा रकम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय जिवन विमा निगमला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने चपराक दिली.
कुंदा अर्जुन कांबळे रा. धर्मापूरी त. साकोली यांची मुलगी दर्शना महेश राजवाडे हिने भारतीय जिवन विमा निगम साकोली येथे एक लक्ष रुपयांची विमा पॉलीसी काढली. त्या विम्याची वार्षिक प्रिमियम ४,८०८ रुपये होती. ही पॉलिसी २८ मार्च २०२९ रोजी मॅच्युअर होणार होती. तक्रारकर्ती कुंदाबाई कांबळे या पॉलिसीमध्ये वारसदार म्हणून नियुक्त करण्यात आली. दरम्यान १३ मार्च २०११ रोजी दर्शना राजवाडे हिचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृत मुलीच्या आईने साकोली येथील शाखा व्यवस्थापकाकडे विमा दावा सादर केला. परंतु विमा कंपनीच्या शाखा व्यवस्थापकाने विमा दावा निकाली काढला नाही. त्यामुळे कुंदाबाई कांबळे यांनी वकीलाच्या मार्फत भारतिय जिवन विमा निगम विभागीय व्यवस्थापक तथा साकोलीचे शाखा व्यवस्थापक यांना नोटीस पाठविले. मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही. यानंतर कुंदाबाईनी भंडारा येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच गाठले. रितसर तक्रार दाखल केली. साक्षपुराव्यांच्या तपासा अंती ग्राहक तक्रार निवारण मंचाने भारतीय जिवन विमा निगमच्या विभागीय व्यवस्थापक व शाखा व्यवस्थापकांना विमा पॉलिसीची १ लाख रुपयांची रकम तक्रार दाखल दिनांक १४ फेब्रुवारी २०१४ पासून संपूर्ण रकम अदायगी पर्यंत दरसाल दरशेकडा ९ टक्के व्याजासह परत करावी, तसेच तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी १० हजार रुपये व तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये अदा करण्यात यावे. असा आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी, सदस्य हेंमतकुमार पटेरिया, गिता बडवाईक यांनी पारित केला. तक्रारकर्तीकडून अ‍ॅड. ए. एम. पटेल यांनी युक्तिवाद केला. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Clutter of Customer Forum to LIC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.