'आॅनलाईन'च्या विरोधात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:01 PM2018-09-28T22:01:23+5:302018-09-28T22:02:01+5:30

आॅनलाईन कंपन्यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील औषधी विक्रीच्या दुकानासह संपूर्ण बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद होती. व्यापाऱ्यांनी मोटरसायकल रॅली काढून शासनाच्या धोरणाचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. भंडारा शहरासह तालुक्यातही या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Cluttering against 'online' | 'आॅनलाईन'च्या विरोधात कडकडीत बंद

'आॅनलाईन'च्या विरोधात कडकडीत बंद

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन : शहरातून काढली मोटरसायकल रॅली, तालुका ठिकाणीही उत्तम प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आॅनलाईन कंपन्यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील औषधी विक्रीच्या दुकानासह संपूर्ण बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद होती. व्यापाऱ्यांनी मोटरसायकल रॅली काढून शासनाच्या धोरणाचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. भंडारा शहरासह तालुक्यातही या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला.
आॅनलाईन कंपन्यांमुळे किरकोळ आणि ठोक व्यापार संकटात आले आहे. आॅनलाईन कंपन्यांना सरसकट परवानगी देण्याच्या विचारात सरकार असून या बाबीचा भंडारा व्यापारी संघाने शुक्रवारी तीव्र विरोध दर्शविला. आॅनलाइन कंपन्याच्या विरोधात आज औषधीसह संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. किराणा, कपडा, इलेक्ट्रॉनीक्स, आॅटोमोबाइल, इलेक्ट्रीक, तसेच इतर व्यापाºयांनी शुक्रवारी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून या धोरणाला कडाडून विरोध दर्शविला. भंडारा जिल्हा व्यापारी संघासह औषधी विक्रेता संघातर्फेभंडारा शहरातील जलाराम सभागृहात सर्व व्यापारी संघांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
यावेळी ५०० पेक्षा जास्त व्यापाºयांनी सहभाग नोंदविला. यानंतर शहरातून दुचाकी रॅली काढीत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी आंदोलनाचे संयोजक निकेत क्षीरसागर, नितीन दुरगकर, संजय निंबार्ते, सोनू कुरंजेकर, संजय खत्री, मनोज संघानी, राहुल निर्वाण, जयेश संघानी, अनिल मल्होत्रा, कमल भोजवानी, मधु वाघाडे, पवन पेशने, दिलीप शहारे, आनंद ठकराल, सुरेश मनवानी, पिंटू इसरानी, नरेंद्र मोहबे, वैभव अडिया, संजय उमाळकर, राजू भोजवानी, जेठालाल हुंदानी, श्याम खुराना, केशव हुंदानी आदि उपस्थित होते. संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद असल्याने अनेकांना याचा फटका बसला.
साकोलीत बंदला यश
साकोली : तालुक्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद व्यापारांकरवी लाभला. साकोली शहरातील सर्वच औषधी दुकाने बंद होती. यावेळी असोसिएशनचे हिरालाल पारधीकर, बलराजसिंह नंदेश्वर, प्रकाश गजापुरे, सुभाष पटले, रूपम गुप्ता, शरद गुप्ता, अरविंद डुंभरे, शिवशंकर बावनकुळे, शरद राऊत आदी उपस्थित होते.
पवनीतही कडकडीत बंद
पवनी : शासनाने औषधी विक्रेत्यांना वेठीस धरले आहे. आॅनलाईन औषध विक्रीला परवानगी देणे, अनैसर्गीक प्रतिस्पर्धा निर्माण करणे, औषधांचा अभाव असणे या सर्व बाबी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होत आहे. याचाच निषेध म्हणून पवनीतही औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाडला. महात्मा गांधी चौकातून रॅलीची सुरूवात करण्यात आली. यात अन्य व्यापाºयांनीही सहभाग घेतला.
मोहाडीत दिले निवेदन
मोहाडी : मोहाडीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाडून तहसीलदार यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविले. यावेळी टेलिकॉम संघटनेचे विक्रम साखरकर, अनिल चिंधालोरे, सिराज शेख, अरविंद निखारे, अफरोज पठान, आशिष पराते, सुरेश वडदकर, विलास वाडीभस्मे, हेमंत मेहर, चैतन्य करंजेकर, रंजन ढोमणे, जगदिश पाटील, सुरेश पाटील, शशिकांत पाटील, स्वस्तीक निमजे, रविशंकर निमजे, मोहन पराते, विठ्ठल महालगावे, प्रभाकर उपरकर, पद्माकर गभने, शेंद्रे, खोब्रागडे, विनोद बडवाईक आदी उपस्थित होते. आंधळगाव येथेही व्यापाऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी गावातून व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.

Web Title: Cluttering against 'online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.