मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:28+5:302021-06-11T04:24:28+5:30

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, वैद्यकीय प्रशिक्षण संस्था, आयुर्वेदिक महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय ज्यांची २० पेक्षा अधिक बेड्स असे ...

CM General Health Skills Development Training Program | मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

Next

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, वैद्यकीय प्रशिक्षण संस्था, आयुर्वेदिक महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय ज्यांची २० पेक्षा अधिक बेड्स असे खाजगी रुग्णालय अशा इस्पितळांचे ग्रीन चॅनलव्दारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था (व्हीटीआय) म्हणून नोंदणी करुन जॉब ऑन ट्रेनिंग पद्धतीने बेरोजगार उमेदवारांना आरोग्य व नर्सिंग क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त जे उमेदवार या क्षेत्रात आधीच काम करत आहे. परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कौशल्य प्रमाणपत्र नाही. त्यांना आरपीएल अंतर्गत प्रमाणपत्र प्रदान करावयाचे आहे. आरोग्य क्षेत्रातील ३६ प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर उमेदवारांना रुग्णालयामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होईल. भंडारा शहरातील तसेच ग्रामीण भागातील बेरोजगार गरजू इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी दिली.

Web Title: CM General Health Skills Development Training Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.