मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते लॉकडाऊनमुळे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:36 AM2021-04-27T04:36:10+5:302021-04-27T04:36:10+5:30

सिहोरा परिसरातील गावांना थेट तुमसर बपेरा राज्यमार्गाला जोडण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे यांनी चांगले नियोजन केले होते. निवडणुकीपूर्वी ...

CM Road Scheme Roads Affected by Lockdown | मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते लॉकडाऊनमुळे प्रभावित

मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते लॉकडाऊनमुळे प्रभावित

Next

सिहोरा परिसरातील गावांना थेट तुमसर बपेरा राज्यमार्गाला जोडण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे यांनी चांगले नियोजन केले होते. निवडणुकीपूर्वी या रस्त्याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम केला होता. अनेक रस्ते महिनाभरात उखडल्याने आरोप-प्रत्यारोप झाले; परंतु कामे थांबली नाहीत. या कालावधीत निधीच्या अडचणी वाढल्या होत्या. कोरोना संसर्गच्या प्रादुर्भावाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे प्रभावित झाली आहेत. या योजनेअंतर्गत रस्त्याच्या खडीकरणाची कामे, पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहेत; परंतु लॉकडाऊन घोषित होताच कामे बंद करण्यात आली आहेत. भरउन्हाळ्यात पुलाच्या बांधकामाला मजबुतीकरणासाठी पाण्याची गरज असताना पाणी मिळणे बंद झाले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रभावाने कंत्राटदारासह मजूर, कामगारांनीही पोबारा केला आहे. बिनाखी ते गोंडीटोला मार्गाच्या नवीन कामासाठी त्यांनी निधी आणला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे कालावधी नियोजन आहे. या कालावधीत कामे पूर्ण होणार नाहीत. यामुळे गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम लांबणीवर जाणार आहेत. गावांना जोडणारे रस्त्याचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आले असल्याने गावकरी मात्र त्रस्त झाले आहेत. ब्राह्मणटोला, बिनाखी ते गोंडीटोला, सुकली नकुल तथा महालगाव फाटा ते गोंडीटोला रस्त्याचे डांबरीकरण अडले आहे. पावसाळा तोंडावर असल्याने गावकरी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याची ओरड करीत आहेत.

बॉक्स

कंत्राटदारांना करावा लागतोय अडचणीचा सामना

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर ई-निविदाअंतर्गत कामे कंत्राटदारांना उपलब्ध झाली आहेत. रस्त्याची नियोजित जागेचे मोजमाप करण्यात आले आहे. रस्त्याची जागा शेतात असल्याने अतिक्रमणात गेली असल्याने कंत्राटदार हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांनी जागा हडपल्यानंतर थेट धुऱ्याचे काम रस्त्यापर्यंत आणले आहे. यामुळे रस्त्याचे बांधकाम करताना कंत्राटदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मुख्य रस्ते अतिक्रमणात गेल्यानंतर पांदण रस्त्याची कल्पनाच करता येत नाही.

Web Title: CM Road Scheme Roads Affected by Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.