सहकार खात्यातील कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन आजपासून

By admin | Published: April 1, 2016 01:07 AM2016-04-01T01:07:27+5:302016-04-01T01:07:27+5:30

सहकारी संस्थांची गुणात्मक व संख्यात्मक वाढ होऊन त्याचा फायदा राज्यातील सर्वसामान्य जनतेला व्हावा या उद्देशातून सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली.

Co-operative employees' workshop closed today | सहकार खात्यातील कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन आजपासून

सहकार खात्यातील कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन आजपासून

Next

कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य : काळ्या फिती लावून केले आंदोलन
भंडारा : सहकारी संस्थांची गुणात्मक व संख्यात्मक वाढ होऊन त्याचा फायदा राज्यातील सर्वसामान्य जनतेला व्हावा या उद्देशातून सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली. परंतु शासन व जनतेची दिशाभूल करून सहकार खात्याच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजामध्ये गुंतवून शासनाची व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यात आली. त्याचा परिणाम सहकारी संसथांच्या गुणात्मक व संख्यात्मक वाढीवर होऊन सर्वसामान्य जनतेच्या ठेवी बुडणे, बेकायदेशिर सावकारी, विकासकांकडून फसविले जाणे असा विपरीत परिणाम झाला आहे.
राज्यातील सहकार विभागातील कर्मचाऱ्यांना एकाचवेळी नियमित कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त संस्था सर्वेक्षण, अवसायन कामकाज, प्रशासक, ८९-अ तपासण्या, निवडणुका आदी कामे वर्ग तीन कर्मचारी करीत असताना कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या, कामांची संख्या व जबाबदारी याचा बिलकुल विचार न करता सर्व कामे एकाचवेळी उरकण्याच्या आग्रहास्तव कर्मचाऱ्यांना कारवाईची भिती दाखवून त्यांच्याकडे असलेल्या कामाच्या संख्येचा विचार न करता सर्व कामे एकाच वेळी पूर्ण करण्याच्या घाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य आले असून त्यांना शारीरिक व मानसिक व्याधींनी ग्रासले आहे. त्यामुळे कर्मचारी आत्महत्येसारख्या मार्गाचा अवलंब करू लागले आहेत. वारंवार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची पदे कमी करून वर्ग एकपेक्षा वरील अधिकाऱ्यांची पदे वाढविण्याचा प्रकार होत आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत संघटनेने केलेल्या पत्रव्यवहारावर कारवाई होत नाही. अडचणींबाबत बैठका होऊनसुद्धा सदर सभेचे इतिवृत्त पाठविले जात नाही. आश्वासनांची पुर्तता केली जात नाही. महाराष्ट्र राज्य सहकार खाते गट क कर्मचारी संघटनेने सभासदांच्या मागणीस्तव आवाहन केल्यानुसार राज्यातील सर्व वर्ग - ३ चे कर्मचाऱ्यांनी ३० व ३१ मार्च रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले. आता १ एप्रिलपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा ईशारा महाराष्ट्र राज्य सहकार खाते गट क कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुप भांडारकर यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Co-operative employees' workshop closed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.