ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकार क्षेत्रच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:42 PM2017-10-26T23:42:10+5:302017-10-26T23:42:19+5:30

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही, सहकारी संस्थांनी मालक व वनता विश्वस्त म्हणून कार्य करावे, ....

Co-operative sector is the only option for rural development | ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकार क्षेत्रच पर्याय

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकार क्षेत्रच पर्याय

Next
ठळक मुद्देशेखर चरेगावकर : सहकार परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही, सहकारी संस्थांनी मालक व वनता विश्वस्त म्हणून कार्य करावे, तरच सहकार चळवळीला गतवैभव प्राप्त होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व सहकारी भारती यांचे विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सहकार परिषदेचे आयोजन भंडारा येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष काका कोयटे, उपकार्याध्य सुदर्शन भालेराव, आयकर व जीएसटी व्याख्याता अभिजीत केळकर, सहाय्यक उपनिबंधक विलास देशपांडे, प्रशांत खोब्रागडे, सहकार भारतीचे प्रदेश पतसंस्थेचे प्रकोष्ठ सहप्रमुख सोमेश्वर मते, सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा पांढरीपांडे उपस्थित होते.
यावेळी शेखर चरेगावकर म्हणाले, जीएसटीमुळे येणारा काळ हा सहकारी संस्थांना चांगले काम करण्यास उत्तम आहे. कोणत्याही प्राचारास बळी न पडता या कराराबाबत सहकार क्षेत्रातील सभासदांनी माहिती करून घ्यावी. तसे मेळावे घेवून प्रबोधन करावे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे करात होणारा बदल समजावून घ्या. त्यामुळे कराबाबत मनात असलेली भीती जाईल व कान्फीडेन्स वाढेल. यासाठी चिंतन करा व बदल स्वीकारा असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा सहनिबंधक सहकारी संस्थांनी याबाबत शैक्षणिक सहली आयोजित कराव्यात. त्यामुळे सहकार क्षेत्राचे सक्षमीकरण होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी अभिजीत केळकर यांनी जीएसटी कायद्याबाबत मार्गदर्शन केले. काका कोयटे यांनी राज्यातील सहकारी दिंडीमध्ये भंडारा जिल्ह्यातील सभासदांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. त्यामुळेच सहकार दिंडीचे यशस्वी नियोजन करता आले, ही भंडारावासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे सांगितले. प्रशांत खोब्रागडे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.
प्रारंभी युवक बिरादरीच्या चमूच्यावतीने सहकार क्षेत्रावर आधारित नाट्य सादर केले. प्रास्ताविकात सहाय्यक निबंधक विलास देशपांडे यांनी सहकारी परिषद तसेच कर्जमाफीसंदर्भात माहिती विषद केली. या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Web Title: Co-operative sector is the only option for rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.