भंडारा येथे शिक्षक परिषदेची सहविचार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 06:00 AM2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:28+5:30

सहविचार सभेला शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी अध्यक्ष पुजा चौधरी, के.के. वाजपेयी, जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपांडे, अशोक वैद्य, के.डी. बोपचे, अशोक रंगारी, दिशा गदे्र, अविनाश पाठक, पुरूषोत्तम डोमळे, सुभाष गरपडे, हरिहर पडोळे, यादवराव गायकवाड, पांडूरंग टेंभरे, दिलीप वाणी, महादेव तेलमासरे, राधेश्याम धोटे, गणेश सार्वे, विजय करंडे, माध्यमिक शिक्षक विभागाचे अधीक्षक मेश्राम आदी उपस्थित होते. याप्रसंगी ३५ प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

Co-Opinion Meeting of Teachers' Council at Bhandara | भंडारा येथे शिक्षक परिषदेची सहविचार सभा

भंडारा येथे शिक्षक परिषदेची सहविचार सभा

Next
ठळक मुद्दे२८ प्रकरणे निकाली : दरमहा १ तारखेला वेतन अदा करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेद्वारे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या दालनात शिक्षकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने संघटना पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत व शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या मार्गदर्शनात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात २८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
सहविचार सभेला शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी अध्यक्ष पुजा चौधरी, के.के. वाजपेयी, जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपांडे, अशोक वैद्य, के.डी. बोपचे, अशोक रंगारी, दिशा गदे्र, अविनाश पाठक, पुरूषोत्तम डोमळे, सुभाष गरपडे, हरिहर पडोळे, यादवराव गायकवाड, पांडूरंग टेंभरे, दिलीप वाणी, महादेव तेलमासरे, राधेश्याम धोटे, गणेश सार्वे, विजय करंडे, माध्यमिक शिक्षक विभागाचे अधीक्षक मेश्राम आदी उपस्थित होते. याप्रसंगी ३५ प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यापैकी ३२ प्रकरणांवर तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र काटोलकर यांनी दिले.
यात १ तारखेला नियमित वेतन देणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करणाऱ्या मुख्याध्यापकांची मान्यता रद्द करणे, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन न देणाऱ्या शाळांवर कार्यवाही करणे, जीपीएफ पावती वाटप करणे, डीसीपीएसचे वाटप करणे, सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ निकाली काढणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल, थकीत वेतन देयके मंजुर करणे, लिपीक पदाकरिता ना-हरकत प्रमाणपत्र, अनुकंपा प्रकरणे निकाली काढणे, वरिष्ठ निवड श्रेणी प्रकरणे मंडळ मान्यता, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिफारशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय चिचाळ, देवी सरस्वती विद्यालय शिंगोरी, नानाजी जोशी विद्यालय शहापूर, येथील कार्यरत शिक्षकांची सामूहिक तक्रार, ज्ञानेश्वर विद्यालय सालेभाटा, नूतन विद्यालय भंडार, बाबुराव मडावी कनिष्ठ महाविद्यालय राजेगाव, आदिवासी शिव विद्यालय गराडा, तिरूपती विद्यालय वडेगाव, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय माडगी, श्रीराम विद्यालय देव्हाडी, रघुते विद्यालय पालोरा, नामदेवराव हायस्कूल घानोड या शाळामधील प्रकरणे सहविचार सभेत मांडण्यात आले. सदर प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिले.
सदर सभेला मार्गदर्शन करताना शिक्षक आमदार गाणार यांनी बऱ्याच वेळा शिक्षकांच्या समस्या शिक्षकांचे प्रश्न व त्यांच्या अडचणी समजून न घेता प्रकरणांना बगल दिली जाते. समस्या सोडविण्याऐवजी प्रश्न किचकट केली जातात, असा प्रकार घडू नये, शिक्षकांवर अन्याय होत असेल तर संवैधानिक मार्गाचा वापर करून कारवाई करण्याविषयी सांगितले.

Web Title: Co-Opinion Meeting of Teachers' Council at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.