कोका वन्यजीव अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 09:33 PM2017-09-03T21:33:16+5:302017-09-03T21:33:35+5:30
यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत.
युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. कोका जवळील सोनकुंड वनतलावाच्या खोलीकरणावर जलयुक्त शिवार योजनेतून लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र दहा किमी परिसरातील उंच दºयाखोºयातून जलसंचय होणारा सोनकुंड वनतलाव कोरडा आहे. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य चिंतेचा विषय ठरत आहे.
मागील दोन वर्षापासून कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाºया शेतकºयांसमोर यावर्षीही भिषण दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकºयांनी केलेली मेहनत वाया गेली असून हलक्या धानाची हजारों एकर शेती रोवणी अभावी पडीत आहे. पेरणी, नागरटी, खत, किटकनाशके, मजुरीचा पैसा शेतकºयांच्या माथ्यावर बसला आहे. परंतु अजूनही शासन-प्रशानाने नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे व मदतीचे आदेश दिलेले नाहीत. शेतकरी आर्थिक कंगाल झालेला असून नैरास्यातुन आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. मागील आठवड्यात तीन शेतकºयांनी दुष्काळी परिस्थितीला कंटाळून स्वत:ला संपविले. शासन शेतकºयांच्या नावाने विविध योजनांची घोषणा करीत असला तरी जमीनीवरील परिस्थिती वेगळीच आहे. कर्जमाफी, पीकविमा या बाबीच आता शेतकºयांना जाचक वाटू लागल्या आहेत. या योजनांचा फारसा फायदा होत नसल्याची ओरड दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
सन २०१३ मध्ये निर्मित कोका वन्यजीव अभयारण्यामुळे वन्यजीवांना सुरक्षीत अधिवास मिळाला. त्यामुळे वन्यजीवांची संख्या झपाट्याने वाढली. अभयारण्य वन्यजीवांसाठी सोयीसुविधा उभारण्यावर व पर्यटनाला चालना देण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र, अभयारण्याच्या बफरझोनमध्ये वन्यजीवांमुळे भितीचे वातावरण आहे. मानव व वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाळीव प्राण्यांचा फडसा व मनुष्य हाणीला सुध्दा सामोरे जावे लागत आहे.
नागरिक सायंकाळी दहशतीत जीवन जगण्यास बाध्य आहेत. नागरिकांना दिलेले रोजगार निर्मितीचे व अन्य सोयीसुविधांचे आश्वासन पूर्ण करण्यात शासनप्रशासन अपयशी ठरल्याची बोंब गावागावात आहे.
यावर्षी अत्यल्प पावसामुळे वन्यजीव व मानव यातील संघर्ष पराकोटीला पोहचण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अभयारण्यातील महत्वपूर्ण वनतलावात, बोड्यात नाल्यात पाण्याचा ठणठणाट आहे. जानेवारी २०१८ पर्यंतही पुरेल ऐवढे पाणी तलावात दिसून येत नाही. अभयारण्यातील बहुतक मोठ्या तलावांची हीच अवस्था आहे.
साकोली ते पालोरा राज्यमार्गालगत असलेल्या सोनकुंड वनतलावाचे खोलीकरण जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. लाखोंचा खर्च यावर करण्यात आला. मात्र, खोलीकरण झालेल्या भागातही पावसाचे पाणी साठविलेले आहे. या तलावात जंगलटेकडींच्या दहा किमी परिसरातील पाण्याचा जलसंचय होत असतानाही भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे दुभिक्ष्य चिंतेचा विषय असून वनाधिकाºयांनी आतापासूनच त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.