जवानांकरिता केले जातेय रक्त पिशव्यांचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:29 PM2018-10-02T21:29:37+5:302018-10-02T21:30:04+5:30
भारतीय लष्करातील जवानांसाठी सात हजार ८४८ व राज्य शासनाच्या रक्तपेढ्यांकरिता ६५ हजार ४८२ रक्त बाटल्या दान आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. सदर उपक्रम जगतगुरू नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीतर्फे राबविले जात आहे. याच अंतर्गत तुमसर तालुकातर्फे नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या जन्मदिनी २ आॅक्टोबरला सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भारतीय लष्करातील जवानांसाठी सात हजार ८४८ व राज्य शासनाच्या रक्तपेढ्यांकरिता ६५ हजार ४८२ रक्त बाटल्या दान आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. सदर उपक्रम जगतगुरू नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीतर्फे राबविले जात आहे. याच अंतर्गत तुमसर तालुकातर्फे नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या जन्मदिनी २ आॅक्टोबरला सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
रक्तदान शिबिरात माऊलींच्या प्रतिमेचे पूजन व फीत कापून शिबिराची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, म्हाडाचे अध्यक्ष मो. तारिक कुरैशी, डॉ. पंकज कारेमोरे, राकाँ महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, माजी नगराध्यक्षा गीता कोंडेवार, अनिल जिभकाटे, नायब तहसीलदार पाटील आदी उपस्थित होते. अतिथींनी जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.दैनंदिन जीवनात केवळ पाच मिनिटे रक्त्दानासाठी आवश्यक असल्याची महत्वपूर्ण माहिती उपस्थितांनी याप्रसंगी दिली.
गुरूबंधू डॉ. पंकज कारेमोरे, प्रा. कमलाकर निखाडे सह शेकडो भक्तांनी यावेळी रक्तदान केले. संचालन व प्रास्ताविक होमराज वनवे तर आभार संध्या शेबे यांनी मानले. रक्तदान शिबिराला संप्रदायातील भक्तसाधक, शिष्य, रक्तदाते उपस्थित होते.
लाखनीत १६० युवकांनी केले रक्तदान
लाखनी : जगुरूरू नरेंद्रनाथ महाराज संस्थान व महाराष्ट्र आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लाखनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीराचे उदघाटन नगराध्यक्षा ज्योती निखाडे व डॉ. संजय पोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत या १६० युवकांनी रक्तदान केले. याप्रसंगी समर्थ महाविद्यालय, सेवक वाघाये कृषी महाविद्यालय येथील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. विष्णुदास तळवेकर, नागराज कोठेकर, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. राखडे, बाबुराव निखाडे, पद्माकर बावनकर, अॅड. कोमलदादा गभणे, महेश आखरे, राजू फंदे, देवचंद लोखंडे, मनीष झिंगरे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.