‘कॉलर्ड स्कोप्स ओऊल’ आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:55 PM2017-09-11T23:55:03+5:302017-09-11T23:55:33+5:30
भंडारा वनपरिक्षेत्र विभागाच्या हद्दीतील पांढराबोडी या गावात केशव साकुरे यांचेकडे दोन दिवसांपूर्वी ‘कॉलर्ड स्कोप्स ओऊल’ या दूर्मिळ प्रजातीचे घुबड भरकटत आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा वनपरिक्षेत्र विभागाच्या हद्दीतील पांढराबोडी या गावात केशव साकुरे यांचेकडे दोन दिवसांपूर्वी ‘कॉलर्ड स्कोप्स ओऊल’ या दूर्मिळ प्रजातीचे घुबड भरकटत आले होते. सदर जखमी घुबडावर तातडीचे उपचार करून घुबडाला नैसर्गिक जिवनशैलीत आल्यानंतर जंगलात सोडून देवून जीवदान देण्यात आले.
पांढराबोडी येथील केशव साकुरे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे यांच्याकडे दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाला जखमी अवस्थेत आणून दिले. सदर घुबड हे पंख्याच्या पात्यामुळे जखमी झाल्याचे सांगितले. त्यावेळी निलय भोगे यांनी त्यांचे वाहन चालक अनिल शळगे यांच्याकडे पुढील उपचारासाठी त्या घुबडाला स्वाधीन केले. शेळगे यांनी वन्यजीव प्रेमी व पक्षी प्रेमी प्रा. डॉ. रवी पाठेकर यांच्या मदतीने तातडीने रात्रीलाच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चिखलकर यांच्याकडे उपचाराकरीता नेले. डॉक्टरांनी घुबडावर त्वरीत उपचार सुरू केले. घुबडाला बाहेरून जखम नसून अंतर्गत जखम असल्याची शक्यता वर्तविली. घुबडाच्या पायात ताकत उरली नव्हती. घुबड अतिशय अशक्त झाले होते. जिवंत राहण्याची शक्यता कमी असलेल्या घुबडाला तंदुरूस्त होण्यासाठी दोन ते तीन दिवस उपचार करण्यात आले. शेवडी डॉ. चिखलीकर व डॉ. रवी पाठेकर तसेच अनील शेळगे यांच्या प्रयत्नांना यश आले व धुबड जखमी अवस्थेतून चांगले झाले व ते आपल्या नियमित जिवनशैलीत येताच डॉ.रवी पाठेकर, अनिल शेळगे, रत्नदिप खोब्रागडे, सुनील साखरवाडे आदींनी त्याला नैसर्गिक जीवन जगण्यास जंगलात सोडून दिले.
घुबडाची ओळख पटविण्यासाठी शहानिशा केली असता, सुरूवातीला सदर घुबड हे गरूड घुबड असल्याचे काही पक्षी निरीक्षकांनी सांगितले. परंतु, याची खरी ओळख भंडारा येथील पक्षी निरीक्षक गझाला खॉन व सातपुडा फाऊंडेशन अमरावती व एन.सी.एस.ए मेळघाटचे अध्यक्ष डॉ. किशोर रीठे यांच्याकडून हा घुबड ‘कॉलर्ड स्कोप्स ओऊल’ असल्याची पुष्ठी झाली.सदर प्रजातीचे घुबड हे प्रामुख्याने दक्षिण आशिया, उत्तर पाकिस्थान व उत्तर भारतात वास्तव्यास असून हिवाळयाच्या दिवसात इतर पक्षांसोबत ते श्रीलंका, मलेशीया व बांगलादेश या देशामध्ये स्थानंतरीत होतात. या प्रजातीचे घुबडाला दिवसा दिसत नसल्याचे सांगण्यात आलेत्न