समूह शेतीसाठी सकारात्मक विचाराने एकत्र या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:41 PM2017-11-22T23:41:37+5:302017-11-22T23:43:12+5:30
शेतीत नवीन प्रयोग करीत पीक पद्धत बदलविणे काळाची गरज आहे.
आॅनलाईन लोकमत
पालांदूर : शेतीत नवीन प्रयोग करीत पीक पद्धत बदलविणे काळाची गरज आहे. पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनात व दर्जामध्ये सुधारणा व्हावी, याकरिता शेतकऱ्यांनी समूह पद्धतीने शेती करणे नितांत गरजेचे आहे, असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांनी केले.
पालांदूर येथील ग्रामपंचायत सभागृहात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, नवनिर्वाचित सरपंच जितेंद्र कुरेकार, माजी सभापती दिलवर रामटेके, कृषी पर्यवेक्षक अरुण रामटेके, अनिल शहारे, कृषी सहाय्यक चुडाराम नंदनवार, श्रीकांत सपाटे, शिल्पा खंडाईत, विभा शिवणकर, व्ही.सी. गिऱ्हेपुंजे, पपीता टिचकुले, घनश्याम पाटील व मदन बोळणे उपस्थित होते. कृषीचे पदवीधर मदन बोळणे यांनी ठिबक व मल्चींगचे वैशिष्ट्ये समजावून सांगितले. घनश्याम पाटील यांनी देखभाल, दुरुस्ती नियोजन याविषयावर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्नांची सरबत्ती करीत उत्तर घेत समधानाने तात्काळ समूह / गट तयार करीत शासनाच्या हाकेला साथ दिली.
नरव्हा, पाथरी, मºहेगाव, ढिवरखेडा, पालांदूर येथील शेतकºयांनी सहभाग घेतला होता. भाजीपाल्यातील विविध पिके घेत परिसरात समृद्धी व्हावी, याकरिता शेतकरी स्वत:च प्रामाणिकतेने सरसावलेला दिसत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातून उत्पादन, विक्री व व्यवस्थापनाचे धडे नियमित सुरु राहत शेतकºयांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडण्याचा मुख्य हेतू पुढे आला आहे.
दामाजी खंडाईत यांनी कृषी अधिकाºयांना कार्यतत्पर होत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत नवनवीन तंत्रज्ञान पोहचविण्याचे आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक अनिल शहारे यांनी किटकनाशक फवारणी करताना विशेष काळजी कशी घ्यायची याबाबद प्रात्यक्षिक दाखविले. कृषी पर्यवेक्षक अरुण रामटेके यांनी प्रगतशिल शेतकºयांना आश्वासीत करीत नियमित मार्गदर्शन देण्याचे मान्य करीत कृषीज्ञान तुमच्याकरिता समर्पीत असल्याचे सांगितले.
संचालन कृषीसहाय्यक शिल्पा खंडाईत, श्रीकांत सपाटे तर आभार कृषीसहाय्यक विभा शिवणकर यांनी केले.