मतदान करायला यायचं हं..! सोशल मीडियात लग्नपत्रिका झाली व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:34 PM2024-04-08T12:34:23+5:302024-04-08T12:34:40+5:30
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लग्नपत्रिकेचा फंडा!
देवानंद नंदेश्वर
भंडारा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लग्नपत्रिकेचा फंडा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. काही सुज्ञ नागरिकांनी लग्नपत्रिकेसारखी ही पत्रिका तयार केली आहे.
भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताचे स्वप्न प्रत्यक्ष उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतांच्या आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, यासाठी हेच निमंत्रण समजून मतदानासाठी यावे, असे या पत्रिकेत म्हटले आहे.
अशी आहे लग्नपत्रिका
nमतदार (भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव) आणि चि. सौ. कां. लोकशाही (भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या) यांचा शुभविवाह वैशाख शु. १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
nविनितमध्ये आम्ही भारताचे लोक वरील विनंतीला मान देऊन मतदान करायला यायचं हं.., आमच्याशिवाय तर मज्जाच नाही, कु. निळीशाई, चि. ईव्हीएम, स्थळ आपले मतदान केंद्र, असा उल्लेख पत्रिकेत आहे.
मतदान हाच आहेर
आपले मतदान हाच आमचा आहेर आणि अन् विकसित भारत हेच रिटर्न गिफ्ट असेल असा उल्लेख पत्रिकेत करण्यात आला आहे. ही पत्रिका समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.