स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी एकत्र या
By admin | Published: November 8, 2016 12:39 AM2016-11-08T00:39:53+5:302016-11-08T00:39:53+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबरला विधान भवन नागपूरवर विशाल मोर्चा व ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे.
राम नेवले : विदर्भ राज्य आंदोलन समिती
परसवाडा : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबरला विधान भवन नागपूरवर विशाल मोर्चा व ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे. त्यांची पूर्वतयारी विदर्भभर सुरु झाली असून ४ वर्षापासून विदर्भ राज्य निर्मितीसाठी अनेक आंदोलन करण्यात आली. केंद्र सरकार एकही पाऊल पुढे टाकत नाही. वेळ मागितला पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग वेळच देत नाही. वैदर्भित जनतेला दिलेले आश्वासन, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन झाले. संपूर्ण विदर्भभर दिंडी यात्रा सुरु आहे. जनजागृती अभियान युवकाद्वारे सुरू आहे. तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन होत आहेत, असे राम नेवले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.
विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा तिरोडाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष अॅड. बोंबार्डे, रंजना माखडे, अॅड. अर्चना नांदघले, सुरेश धुर्वे, शामराव झरारीया, कृष्णकुमार दुबे, अॅड. योगेश हरिणखेडे, व्ही.आर. झरारीया, हुपराम जमईवार, राधेलाल नागपुरे, योगेश हिंगे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन अॅड. अर्चना वाघले यांनी केले. आभार हुपराज जमईवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुषार बोंबार्डे, तुरकर, लिल्हारे, चंद्रकांत साबंडे, डॉ. शेंडे, रफीक शेख, मनोहर नंदनवार आदिंनी सहकार्य केले. (वार्ताहर)