दिलासादायक ! १२०७ कोरोनामुक्त, ८३३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:36 AM2021-04-20T04:36:52+5:302021-04-20T04:36:52+5:30
कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा मिळत असला तरी मृत्यूची संख्या मात्र तेवढीच नोंदविण्यात आली. सोमवारी २१ जणांना कोरोनाने बळी ...
कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा मिळत असला तरी मृत्यूची संख्या मात्र तेवढीच नोंदविण्यात आली. सोमवारी २१ जणांना कोरोनाने बळी गेला. त्यात भंडारा तालुक्यातील ११, मोहाडी, लाखनी प्रत्येकी दोन, तुमसर-पवनी प्रत्येकी एक आणि साकोली तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील एका ३३ व ३७ वर्षीय तरुणासह ११ जणांचा मृत्यू झाला. मोहाडी तालुक्यातील २९ वर्षीय तरुण आणि ४२ वर्षीय महिलेचा तर पवनी तालुक्यातील ३६ वर्षीय महिला आणि तुमसर तालुक्यातील ४० वर्षीय पुरुषाचाही कोरोनाने मृत्यू झाला. लाखनी तालुक्यात एका ३६ वर्षीय महिलेचा तर साकोली तालुक्यातील एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ५० च्या आतील वयोगटातील मृतांची संख्या वाढत असल्याचे दिसत असून ही चिंताजनक बाब आहे.
बॉक्स
आतापर्यंत २५ हजार ४०० व्यक्तींची कोरोनावर मात
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३८ हजार ४३२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी २५ हजार ४०० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यात भंडारा तालुक्यातील १० हजार ६९६, मोहाडी २२२५, तुमसर ३३५५, पवनी २९३२, लाखनी २७७१, साकोली २३६०, लाखांदूर १९६१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५८० व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यात सर्वाधिक २८३ भंडारा तालुक्यातील आहेत. मोहाडी ५०, तुमसर ७९, पवनी ६४, लाखनी ३७, साकोली ४२, लाखांदूर २५ रुग्णांचा समावेश आहे.