कमांडो ग्रुपने केली तीर्थक्षेत्राची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 AM2021-07-07T04:43:33+5:302021-07-07T04:43:33+5:30
शहापूर : जिल्ह्यातील, तसेच तालुक्यामध्ये चर्चेत असलेल्या कमांडो ग्रुप गोपीवाडा शहापूरतर्फे बलाची पहाडी गोपीवाडा, निहारवानी येथे तीर्थक्षेत्र, पर्यटनाकडे जाणारा ...
शहापूर : जिल्ह्यातील, तसेच तालुक्यामध्ये चर्चेत असलेल्या कमांडो ग्रुप गोपीवाडा शहापूरतर्फे बलाची पहाडी गोपीवाडा, निहारवानी येथे तीर्थक्षेत्र, पर्यटनाकडे जाणारा मुख्य मार्ग, तसेच मुख्य मार्गालगत असलेला झरा, झराच्या पाणी साठ्यासाठी असलेली टाकीची स्वच्छता केली. बलाची पहाडी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतात आणि कचरा टाकतात. त्यामुळे तीर्थक्षेत्रामध्ये अस्वच्छता होते. त्यामुळे रोगराई पसरू नये हे कमांडो ग्रुपचे मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या लक्षात आले. सर्व कमांडो ग्रुप मिळून तीर्थक्षेत्र बलाची पहाडीची स्वच्छता करू, असा निर्णय घेतला.
कमांडो ग्रुप नेहमी समाजसेवेसाठी पुढे असतो, तसेच कमांडो ग्रुप गोपीवाडा येथे मोफत आर्मी व पोलीस प्रशिक्षण दिले जाते.
कमांडो ग्रुप गोपीवाडा शहापूर, मार्गदर्शक चंद्रशेखर डोळस यांच्या उपस्थितीत आदेश कानतोडे, अंशुल झलके, प्रवीण मस्के, राहुल गभने, सकिल मेश्राम, निखिल मेश्राम, मोहन भांडारकर, विशाल मोहुरले, सागर नागपुरे, मंथन लांडगे, करण मांढरे, साक्षी मारबदे, श्रेया शेंडे आदी कमांडो ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.