पालांदूर येथे लसीकरण मोहिमेचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:37 AM2021-05-08T04:37:20+5:302021-05-08T04:37:20+5:30
पालांदूर : शासनाच्या निर्देशानुसार कोरोना संकटाला तोंड देण्याच्या हेतूने पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण ...
पालांदूर : शासनाच्या निर्देशानुसार कोरोना संकटाला तोंड देण्याच्या हेतूने पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरज वाणी, परिचारिका स्नेहा मेश्राम व लाभार्थी घनश्याम भेदे पालांदूर यांच्या उपस्थित करण्यात आला.
लसीकरणाकरिता आरोग्यसेतू किंवा कोविन ॲपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अत्यावश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.
लसीकरणाची वेळ दुपारी २ ते ५ ठेवण्यात आलेली आहे. दुसरा डोस एक महिन्यानंतर नियोजित आहे. तरुणांनी कोविड लस सुरक्षित असून खोट्या प्रचाराला थारा न देता लसीकरण करण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरज वाणी यांनी केले आहे. कोरोना संकटाला तोंड देण्याच्या हेतूने शासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरण आटोपल्यानंतर इतरही सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. मास्क, सामाजिक अंतर व लसीकरण ही त्रिसूत्री प्रत्येक नागरिकाला वापरायची आहे.
स्वतः सुरक्षित राहून इतरांना सुरक्षित करण्याकरिता प्रत्येक जागरुक नागरिकांनी वेळीच दखल घेणे महत्त्वाचे आहे. लस घेतल्यानंतर किमान एक ते दोन दिवस ताप ,थकवा राहण्याची शक्यता आहे. आणखी काही प्रकृतीत बदल वाटल्यास आरोग्य विभागाशी अर्थात ग्रामीण रुग्णालयांशी संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा डॉक्टर वाणी यांनी केले आहे.
निर्धारित व नियोजित वयोगटातील व्यक्तींना लसीकरण सुरू राहणार आहे. सकाळ पाळीत व दुपार पाळीत लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे. लसीकरणाच्या वेळी रुग्णालयांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे.
कोरोना संबंधाचे संपूर्ण निर्बंध पाळत कोरोनाची साखळी तोडण्याकरिता प्रत्येक नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
बॉक्स
लसीकरण करिता रुग्णालयात गर्दी करू नये. लसीकरण आटोपल्यावर सुद्धा शासनासह आरोग्य विभागाने पुरवलेल्या सूचनांचे पालन करावे. लसीकरण करिता सगळ्यांनी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
डॉ. सुरज वाणी,
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पालांदूर