महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:22 PM2018-03-23T22:22:50+5:302018-03-23T22:22:50+5:30
महिला संरक्षण कायदा कडक न केल्याने महिला असुरक्षित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. महिला आरक्षण कायदा तसाच पडून आहे. निवडणूकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केले नाही.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : महिला संरक्षण कायदा कडक न केल्याने महिला असुरक्षित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. महिला आरक्षण कायदा तसाच पडून आहे. निवडणूकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केले नाही. केवळ दिशाभूल करण्याचे काम केले आहे. त्याउलट काँग्रेस पक्ष महिला सशक्तीकरणाकरिता कटीबध्द आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा चारुलता टोकस यांनी केले.
तुमसर येथे संताजी मंगल कार्यालयात आयोजित भंडारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हास्तरीय महिला कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याचे उद्घाटन अखिल भारतीय महिला काँग्रेस कमेटीच्या महासचिव व महाराष्ट्र प्रभारी ममता भूपेश यांनी केले. विशेष अतिथी म्हणून माजी खासदार तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले, माजी खा. केशवराव पारधी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आ. सुभाषचंद्र कारेमोरे, माजी आ. आनंदराव वंजारी, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, प्रदेश सरचिटणीस जिया पटेल, मधुकर लिचडे, डॉ. पंकज कारेमोरे, प्रमिला कुटे, ज्योती झोड, उषाताई मेंढे, जि.प. सभापती रेखाताई वासनिक, सभापती प्रेम वनवे, नगरसेवक अमरनाथ रगडे, मोहाडी नगराध्यक्ष स्वाती निमजे, उपाध्यक्ष सुनिल गिरीपुंजे, जि.प. सदस्य के.के. पंचबुध्दे, शंकर राऊ त, प्रभू मोहतुरे उपस्थित याप्रसंगी महिला पदाधिकारी ममता भुपेश, माजी खा. नाना पटोले तथा अतिथिंनी संबोधित केले. प्रास्ताविक महिला मेळाव्याच्या आयोजक तथा जिल्हा महिला काँग्रेस कमेटी अध्यक्ष सीमा भूरे यांनी केले. संचालन साकोली तालुकाध्यक्ष छाया पटले तर, आभार तुमसर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सुनिता टेंभुर्णे यांनी मानले.
यावेळी तुमसर तालुक्यातील महिला, पुरुष कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. यात योगीता देशभ्रतार, सविता चोले, रेखा निमजे, प्रणय देशमुख, शिवराज ठाकूर, पिपºयाच्या सरपंच वंदना भुरे, चिखला येथील मडावी तथा शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी पती निधनानंतर तुमसर शहरात पान दुकान चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या आशा रमेश रोंघे यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उषा शहारे, जि.प. अध्यक्ष गोंदिया उषा मेंढे, माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, ज्योती झोड, पुष्पा भोंडे, शिल्पा भोंडे, ज्योती हरडे, तक्षशिला वाघधरे, आशाताई गिऱ्हेपुंजे, भावनाताई शेंडे, कल्पना गभने, ताराबाई नागपूरे, प्रिया खंडारे, रजनी मुळे, निर्मला कापगते, लता प्रधान, योगिता हुकरे, वर्षा बारई, स्वाती निमजे, सत्यशिला राहांगडाले, अॅड. प्रमोद ईलमे, कमलाकर निखाडे, किशोर चौधरी, विकास भुरे, विजय गिरीपुंजे, राजेश पारधी, अंकुश बनकर, शिवलाल नागपूरे सह मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.
‘त्या’ वृक्षांना श्रद्धांजली
तुमसर नगरपरिषदेने संताजी मंगल कार्यालयामागील ७० वृक्षांची कत्तल केली होती. त्याचा निषेध म्हणून बावनकर चौकात महिला काँग्रेस मेळाव्याला आलेल्या माजी खासदार नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी ममता भूपेश, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस, डॉ. पंकज कारेमोरे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, माजी नगराध्यक्ष तथा शहर काँग्रेस अध्यक्ष अमरनाथ रगडे तथा शेकडो काँगे्रस कार्यकर्त्यांनी वृक्ष प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहीली. शासन एकीकडे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवित आहे. येथे वृक्षांची कत्तल करणाºयांवर वनविभागाने अद्याप कारवाई केली नाही. या प्रकरणात काँग्रेस मोठे जनआंदोलन उभारेल, असा इशारा काँग्रेस नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी यावेळी दिला.