शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध
By admin | Published: May 28, 2017 12:27 AM2017-05-28T00:27:31+5:302017-05-28T00:27:31+5:30
शेतकऱ्यांच्या उन्नत शेतीसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वाेत्तर प्रयत्न करीत आहे.
चरण वाघमारे : आमदारांनी जाणल्या शेतकऱ्यांच्या भावना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांच्या उन्नत शेतीसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वाेत्तर प्रयत्न करीत आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत प्रगती होवून सक्षम शेतकरी निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा शेतकऱ्याच्या बांध्यांवर उपलब्ध करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगिण हितासाठी वचनबद्ध असल्याचे आ. चरण वाघमारे यांनी शिवार संवाद फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
आ. चरण वाघमारे याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिवारात जावून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी शिवार संवाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. चरण वाघमारे यांच्यासह संदीप ताले, कविता बनकर, भाऊराव तुमसरे, तारिक कुरैशी, बंडू बनकर, राहूल डोंगरे, हरेंद्र रहांगडाले, बाळकृष्ण गाढवे, राजेश पटले, ममता घडले, राजु तोलानी, नरेंद्र गौरे, सुरेश पारधी, मनिराम गावठे, निर्मला कापसे, रूपा सोनवाने, गुरूदेव भोंडे, प्रकाश दुर्गे, बाल्या मदनकर, अशोक उईके, नंदलाल खंडाते, रेखा धुर्वे, महेश उचिबगले, संजय कावळे, बंडू गौपाले, गोविंद खुने, फुलचंद गौपाले, अशोक रहांगडाले व शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचे तात्काळ निर्देश दिले. आ. वाघमारे यांनी विरोधी पक्षाच्या १५ वर्षाच्या "जुल्मी" वनवासातून शेतकऱ्यांना भाजप सरकारने अडीच वर्षातच बाहेर काढून शेतीसंबंधाच्या सर्वच विभागाला भरभरून निधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १५ वर्षात विरोधकांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांना फक्त २३ हजार विद्युत कनेक्शन शेतीसाठी फक्त आठ तास विज व एक इंचही सिंचन या काळात वाढली नाही. याउलट भाजप सरकारने अडीच वर्षात शेतकऱ्यांना दोन लाख ७५ हजार विद्युत कनेक्शन दिले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेतीसाठी सिंचनाची सोय व १२ तास विद्युत पुरवठा यासह शेततळे धडक सिंचन योजनेमार्फत दहा हजार विहिरी व विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठे करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे आता शेतीतही अच्छे दिवसाची सुरवात झाली असल्याचे आ. चरण वाघमारे यांनी सांगितले.
या शिवार संवाद फेरी कार्यक्रमाच्या माध्यमातून सितासावंगी, धुटेरा, पाथरी, डोंगरी बु., गर्रा बघेडा, आंबागड, लोहारा या पं.स. क्षेत्रातील शेतकऱ्यांचा आ. चरण वाघमारे यांनी प्रत्यक्ष संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सोदेपूर येथे आ. वाघमारे यांनी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तलावातील गाळ काढण्याच्या कामाचे भूमिपूजन करून अर्धातास शेतकऱ्यांसह तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.