महिलांच्या विकासाकरिता कटिबद्ध

By admin | Published: March 18, 2016 12:40 AM2016-03-18T00:40:27+5:302016-03-18T00:40:27+5:30

देशाच्या सामाजिक, राजनितीक, आर्थिक व प्रगती स्तरावर महिलांची भूमिका अग्रणी ठरत आहे.

Committed to women's development | महिलांच्या विकासाकरिता कटिबद्ध

महिलांच्या विकासाकरिता कटिबद्ध

Next

शुभांगी रहांगडाले यांचे प्रतिपादन : मोहाडी येथे महिला मेळाव्याचे आयोजन
चुल्हाड (सिहोरा) : देशाच्या सामाजिक, राजनितीक, आर्थिक व प्रगती स्तरावर महिलांची भूमिका अग्रणी ठरत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलामध्ये शिक्षणाचे रोपटे पेरले असता त्यांचे आजघडीला विशाल वटवृक्ष तयार झाले आहे. महिला व विशेषत: ग्रामीण महिलांच्या विकासाकरिता शासकीय योजना त्याचे थेट दरापर्यंत पोहचविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले यांनी व्यक्त केले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प तुमसर अंतर्गत आयोजित मोहाडी (खापा) येथील महिला व बाल मेळाव्यात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर यांचे हस्ते मोहाडी (खापा)चे पंचायत समिती सदस्य विमल कानतोडे यांचे अध्यक्षतेखाली झाले. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, रेखा ठाकरे, बपेरा पंचायत समितीचे सदस्य सुप्रिया राहांगडाले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आशा नागुलवार, अंगणवाडी सेविका गीता पचघरे, मदतनिस विमल वैद्य, ममता तुरकर, शारदा कानतोडे, आरोग्य सेविका सोनवाने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, पंचायत समिती सदस्य राजेंद्र ढबाले, उमेश तुरकर, सरपंच कुंवरलाल बुद्धे, जितेंद्र तुरकर, किशोर रहांगडाले, सहाय्यक बिडीओ मनोज हिरुडकर, विस्तार प्रकल्प अधिकारी श्रीकांत खडजी उपस्थित होते.कार्यक्रमात माजी सरपंच अंबादास कानतोडे, सुनिल माने, हरिद्वार पटले, भाग्यश्री पटले, अनुसया बुद्धे, तिलका तुरकर, कविता शरणागत, पोलीस पाटील कैलाश मिराशे, तंमुसचे अध्यक्ष मनोहर शरणागत, शाखा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दामोदर बुद्धे, विनायक तुरकर, गुलाब तुरकर, संतोष शरणागत, स्वाती शरणागत, भारती तुरकर, पाणलोट समिती सचिव रंजित बुद्धे, ग्रामसेवक नागदेवे उपस्थित होते.
संचालन पर्यवेक्षिका धनवंता राणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका रत्नमाला वैद्य यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Committed to women's development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.