स्पर्धा, अभ्यासात्मक दृष्टिकोनातून विकास शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2017 12:24 AM2017-01-23T00:24:10+5:302017-01-23T00:24:10+5:30
समाजाच्या सर्वांगिण विकासाकरिता स्पर्धात्मक दृष्टी जपा. कष्टाने मुलांना घडवा, स्पर्धा खूप मोठी असल्याने अभ्यासाची दृष्टी व्यापक ठेवा.
नाना पटोले यांचे प्रतिपादन : झाडे कुणबी समाजाचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा
भंडारा : समाजाच्या सर्वांगिण विकासाकरिता स्पर्धात्मक दृष्टी जपा. कष्टाने मुलांना घडवा, स्पर्धा खूप मोठी असल्याने अभ्यासाची दृष्टी व्यापक ठेवा. ओबीसी स्वतंत्र मंत्रालयाने आम्हाला न्याय निश्चित मिळेल. राज्य सरकार प्रमाणेच केंद्र सरकारला सुद्धा स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापनेची विनंती केली आहे. सामाजिक व्यवस्थेला उभारी मिळण्याकरिता स्वत: प्रामाणिक राहून तुम्हालाही मेहनत घ्यायची आहे असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
झाडे कुणबी समाज कौटुंबिक स्नेहसंमेलनात ज्योतिबा फुले कॉलनीतील पटांगणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, शुभांगी मेंढे, प्रा.हरिभाऊ पाथोडे, रुपजी कोरे, नामदेव चुटे, नवनिर्वाचित नगरसेवक वनिता डोये आदी उपस्थित होते.
यावेळी पटोले यांनी, भंडाऱ्याच्या विकासाकरिता शेजारील भोजापूर, गणेशपूर, खोकरला आदी ग्रामपंचायतीला नगरपालिकेत समायोजन करून विकासात्मक निधी आणण्याकरिता मोठी मदत होईल. शहराची विकासगंगा प्रवाहित राहण्याकरिता सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. भेल ला १००० मेगावॅटची क्षमता वाढवून कॅबीनेटची परवानगी मिळाली आहे. यात स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी या वर्षापासून मिळणार आहेत. प्रा. हरिभाऊ पाथोडे यांनी, समाजबांधवांना प्रेरीत करण्याकरिता अनेक अभ्यासाचे पैलू विस्तृत विवेचन केले. त्यांचा नितीश पाथोडे हा मुलगा युपीएससी परीक्षेत कसा यशस्वी झाला. त्याकरिता विद्यार्थ्यांनी कसे अभ्यास केले पाहिजे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकेतून समाजाचे अध्यक्ष पांडुरंग फुंडे यांनी, समाजाच्या विकासाकरिता प्रत्येकांनी जबाबदारी सांभाळावी. समाजाच्या विकासात सर्वांचेच श्रेय महत्वाचे आहे. इंदिरा सागर प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना न्याय द्यावा. हक्क सोडण्याविषयी व आपसी बटवाऱ्याकरिता महसूल व नोंदणी कार्यालयात शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. ही पद्धत बदलून एकाच कार्यालयात सहजतेने कमी खर्चात कामे करावे अशी मागणी ठेवली.
यावेळी १० व १२ वी च्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांत तेजस्वीनी तरोणे, मोहनीश खोटेले, मृणाल शिवणकर, काजल फुंडे, फाल्गूनी फुंडे, निशांत फुंडे, मृणाली हुकरे, वेदांती पटोले, मोहिनी दोनोडे, ज्योत्स्ना कोरे, हितेंद्र पागोटे, चिन्मय चुटे यांचा सन्मान करण्यात आला. मुलींनी आकर्षक रांगोळ्या घालून समाजबांधवांचे लक्ष खेचले. हितेंद्र पागोटेचा प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत स्मार्ट फोनचा सकारात्मक दृष्टीने वापर करण्याचा सल्ला दिला. नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी, समाजबांधवांना मुलांना साकारण्याचे आव्हान केले. मातापित्यांनी जबाबदारी सांभाळत नेऊन मुलं घडवा अशी सूचना शुभांगी मेंढे यांनी दिल्या. वेषभूषा, रंगीबेरंगीने छोटे सरकार पुढ्यात असल्याने मंडपाची व कार्यक्रमाची रंगत न्यारी ठरली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. समाजाच्या विकासनिधीत भरीव मदत करणाऱ्यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. खा. पटोले यांच्या विकासनिधीतून २५ लक्ष रुपयाच्या सभागृहाच्या बांधकामाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. वधू वर परिचय कार्यक्रम यशस्विपणे पार पडला.
संचालन सारिका दोनोडे यांनी केले. आभार निता चुटे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्योती ब्राम्हणकर, परिनिता फुंडे, मोहिनी पाथोडे, इंदिरा ब्राम्हणकर, शरद कोरे, महिंद्रा कठाणे, अरुण शिवणकर, गजानन शिवणकर, प्रकाश शिवणकर, प्रा.घनश्याम चुटे, अशोक चुटे, राजेंद्र डोये, हिरालाल ब्राम्हणकर आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)